वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST2021-01-22T04:26:04+5:302021-01-22T04:26:04+5:30

वीज वितरण जनित्र बनले धोकादायक जिवती : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावात डीपी उघड्या ...

Demand for wildlife conservation | वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

वीज वितरण जनित्र बनले धोकादायक

जिवती : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावात डीपी उघड्या राहतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पिंपळगाव मार्गाची दुरुस्ती करावी

चिमूर : तालुक्यातील पिंपळगाव-नवतळा ही गावे ८ किमी अंतरावर आहेत. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

नवरगाव : नवरगाव-रत्नापूर येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवरगाव-रत्नापुरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागते.

रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई

चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या ११ वाहनचालकांवर पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली. यामध्ये बल्लारपूर पोलिसांनी चार, ब्रह्मपुरी एक, तर चंद्रपूर पोलिसांंनी सहा वाहनचालकांवर कलम भांदवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Demand for wildlife conservation