जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:40 IST2020-12-14T04:40:11+5:302020-12-14T04:40:11+5:30

व्यायाम शाळा उभारण्याची मागणी नागभीड: तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायमशाळा मंजूर करण्याची ...

Demand for animal care | जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

व्यायाम शाळा उभारण्याची मागणी

नागभीड: तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायमशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र अजूनही काही गावांत व्यायाम शाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहे. मात्र भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.

प्रशासकांना दिलासा

चंद्रपूर : जिल्ह्यातील सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला अशा ग्रामपंचायतीवर प्रशासनाने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायतीचे कामे सांभाळायची की, संबंधित कार्यालयाची यासंदर्भात तारांबळ उडत आहे दरम्यान, आता ग्रामपंचायतची निवडणूक तारीख जाहीर झाल्यामुळे या प्रशासकांना दिलासा मिळाला आहे.

विरंगुळा केंद्र सुरु करण्याची मागणी

चंद्रपूर : तुळशीनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी जागा आरंक्षित करण्यात आली आहे. मात्र या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे या केंदात सुविधा पुरवून केंद्र अद्ययावर करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागकिकांनी केली आहे.

Web Title: Demand for animal care