शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी चंद्रपूर :जिल्ह्यात विविध योजनेची कामे करण्यात आली. विहीर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र, ...

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

चंद्रपूर :जिल्ह्यात विविध योजनेची कामे करण्यात आली. विहीर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र, मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळत नसल्याने अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे. खरीप हंगामातही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

साठगाव-काकेपार रस्त्याची दुरुस्ती करा

चंद्रपूर : चंद्रपूर, भंडारा तसेच नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या साठगाव ते काकेपार रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी विनोद गावंडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

अपघाताची शक्यता

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडीयम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडीयम लावल्यास अपघाताला आळा घालणे शक्य होणार आहे.

जनावरांचा बंदोबस्त करावा

मूल : शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. नगरपरिषदने मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

प्लास्टिकबंदी कागदावरच

चंद्रपूर . चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी प्लास्टिकची विक्री सुरू आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम बघता राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली. त्यानंतर त्याचा वापर न करण्याबाबत सूचना दिल्या. मात्र, सध्या मोहीम थंडावली आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

तुळशीनगरातील रस्त्यांची दुरवस्था

चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उमा नदीवरील पुलाची उंची वाढवा

सिंदेवाही : तालुक्यातील कळमगावजवळील उमा नदीवर अस्तित्वात असलेला पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. कळमगाव (गन्ना) परिसरातील मोहाली विसापूर, कुकडहेती, चारगाव व इतर गावांना उमा नदीला पूर आल्यास २० कि.मी. अंतर कापून सिंदेवाहीला जावे लागते.