शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय त्‍वरित मागे घ्‍यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:26 IST

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. राज्‍यातील ८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय ...

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. राज्‍यातील ८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतल्‍यानंतर आ. मुनगंटीवार यांनी ५ मे रोजी सार्वजनिक आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांच्‍याशी दूरध्‍वनीद्वारे संपर्क साधून सदर निर्णय मागे घेण्‍याची विनंती केली होती. मंत्री राजेश टोपे यांनी त्‍वरित हा निर्णय मागे घेत बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्‍त करण्‍यात येणार नाही, असे स्‍पष्‍ट आदेश दिले होते. मात्र १० दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप हा निर्णय मागे घेण्‍यात आलेला नाही व सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्‍यात आला नाही, असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

आज कोरोना महामारीच्‍या काळात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये त्‍यांना नियुक्‍त्‍या मिळणे आवश्‍यक आहे. त्‍याचप्रमाणे त्‍यांना सध्‍या देण्‍यात येणा-या वेतनात वाढ करण्‍याची सुध्‍दा आवश्‍यकता असल्‍याचे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. ना. राजेश टोपे यांनी आश्‍वासन दिल्‍यानंतर आपण त्‍यांना रोज स्‍मरणपत्रे पाठवून हा निर्णय मागे घेण्‍याची विनंती केली आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने बघण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. बैठकीला डॉ. अक्षय जव्‍हेरी, डॉ. निशिगंधा, डॉ. अश्‍विनी भोयर, डॉ. सचिन पांडव, क्षितीज झाडे, डॉ. सूरज पवार, डॉ. योगेश देवतळे, डॉ. खुशबू जोशी, डॉ. स्‍वप्‍निल हिवराळे, डॉ. विष्‍णू बावणे, डॉ. करिश्‍मा येडे, डॉ. स्‍वप्‍निल मून, डॉ. मोरे, डॉ. दीपक ढोके, डॉ. अनामिका चंद्रगिरीवार, डॉ. नितीन मॅकलवार, डॉ. पायल वरभे, डॉ. संतोष गोफणे, आदींची उपस्थिती होती.