शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांसह काही शहरी भागामध्येही लसीकरणाबाबत बऱ्याच अफवा आहे. अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांमध्येच अधिक प्रमाणात तर्कवितर्क काढले जात असल्याचे चित्र आहे. विशेषत: लसीकरणानंतर मृत्यू होताे, निपुत्रिक होते, नपुंसकता येत असल्याच्याही मोठ्या प्रमाणात अफवा आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी वाढण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देजनजागृती करणे गरजेचे : शहरात गर्दी तर ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे ओस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोराना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. मात्र लसीकरणासंदर्भात ग्रामीण तसेच दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात अफवा असल्यामुळे बहुतांशजण लसीकरण करण्याकडे पाठ फिरवित आहे. दरम्यान, टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही तालुक्यांत अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांसह काही शहरी भागामध्येही लसीकरणाबाबत बऱ्याच अफवा आहे. अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांमध्येच अधिक प्रमाणात तर्कवितर्क काढले जात असल्याचे चित्र आहे. विशेषत: लसीकरणानंतर मृत्यू होताे, निपुत्रिक होते, नपुंसकता येत असल्याच्याही मोठ्या प्रमाणात अफवा आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी वाढण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विशेषत: जिवतीमध्ये सर्वात कमी लसीकरण झाले असून सर्वाधिक लसीकरण भद्रावती तालुक्यात झाले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय स्तरावर ग्रामीण भागात जनजाजगृती केली जात आहे. मात्र दुर्गम भागात जनजागृतीची गरज आहे. 

काय आहेत अफवा...

नपुंसकता कोरोना संकट डोक्यावर असतानाही काही नागरिकांमध्ये लसीकरणामुळे नपुंसकता येईल, अशी भीती आहे. विशेषत: गावा-गावात यावर उघडपणे  तरुणांमध्ये चर्चाही होताना दिसून येत आहे.

अकाली मृत्यूकोरोना लस घेतल्यामुळे अकाली मृत्यू होतो, ही अफवाही मोठ्या प्रमाणात पसरविली जात आहे. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर लावायचे, मात्र  लस घ्यायची नाही, असा पवित्राही गावातील अनेकांनी घेतला   आहे.

निपुत्रिकाची भीतीलसीकरणामुळे निपुत्रिक होण्याची भीती अनेकांना आहे, अशी अफवाही गावा-गावात पसरविली जात आहे. विशेषत: सुशिक्षितांमध्येही याबाबत सावधता बाळगली जात आहे. विवाहइच्छुक तरुण, तरुणी तसेच ज्यांचे नुकतेच विवाह झाले आहेत, असेही काही जण लसीकरण करण्यासाठी उदासीन आहे.  शहरामध्येही यासंदर्भात सध्या चर्चांना वेग आला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या