शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 5159 जागांसाठी उसळली इच्छुकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

१८ प्रकारच्या कागदपत्रांसह ऑनलाईन नामांकन दाखल करताना उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मंगळवारी   ऑफलाईन  नामांकन  दाखल करण्याची परवानगी दिल्याने आज सकाळी ११ वाजतापासून इच्छूकांची प्रचंड गर्दी झाली.  घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी  निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे अखेरच्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाले नाही. हडस्तीमध्ये सात जागांसाठी ९ नामांकन दाखल झाले.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : रात्री उशिरापर्यंत नामांकन घेणे सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर  : जिल्ह्यातील ६ हजार २९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करणे सुरूच होते. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची परवागनी दिली. त्यामुळे इच्छुकांनी तहसील कार्यालय  परिसरात प्रचंड गर्दी केली. २३ डिसेंबरपासून नामांकन दाखल करणे सुरू झाले होते. मात्र, लिंक नसल्याने उमेदवारांची प्रारंभापासूनच तारांबळ उडाली होती.  ३१ डिसेंबर रोजी नामांकन अर्जांची छाननी होणार असून त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींच्या १ हजार ९८१ प्रभागातून ५  हजार १५९  सदस्यांना निवडून द्यायचे आहे. यासाठी २ हजार १२८ मतदान केंद्र तयार करण्यात आले. या निवडणुकीत ९ लाख ३५ हजार १७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये सुमारे १५ हजार नवमतदार असल्याचे माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. १८ प्रकारच्या कागदपत्रांसह ऑनलाईन नामांकन दाखल करताना उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मंगळवारी   ऑफलाईन  नामांकन  दाखल करण्याची परवानगी दिल्याने आज सकाळी ११ वाजतापासून इच्छूकांची प्रचंड गर्दी झाली.  घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी  निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे अखेरच्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाले नाही. हडस्तीमध्ये सात जागांसाठी ९ नामांकन दाखल झाले.

१५ जानेवारी रोजी फैसलाचंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस ग्रामपंचायतीमध्ये एकही नामांकन दाखल झाले नाही. बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ ९ नामांकन दाखल झाले असून दोन जागांवर निवडणूक होण्याचे संकेत आहे. अन्य ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक रणधुमाळी बघायला मिळणार आहे. यासाठी राजकीय पक्षही गुंतले आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपयर्यंत जिल्ह्यात ३ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले होते. बुधवारी उशिरापर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक