गुरूनानक महाविद्यालयात भौतिकशास्त्रावर परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:38+5:302021-05-05T04:46:38+5:30

बल्लारपूर : येथील गुरूनानक विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अमरावती येथील पी. आर. पोटे-पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ...

Council on Physics at Guru Nanak College | गुरूनानक महाविद्यालयात भौतिकशास्त्रावर परिषद

गुरूनानक महाविद्यालयात भौतिकशास्त्रावर परिषद

बल्लारपूर : येथील गुरूनानक विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अमरावती येथील पी. आर. पोटे-पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भौतिकशास्त्रावर ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय परिषद मटेरियल आणि नॅनो टेक्नॉलॉजी या विषयावर परिसंवाद नुकताच पार पडला.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून गुरूनानक महाविद्यालयाचे संस्थापक नगेन्द्र सिंग सोनी, पोटे महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रवीण पोटे, प्राचार्य डॉ. बी. एम. बहिरवार, डॉ. अशोक जोगी, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. व्ही. काळे उपस्थित होते. यावेळी डॉ. कॉन्स्टायनटीन (रशिया), प्रा. रामचंद्र पोडे (दक्षिण कोरिया), प्रा. एस. जे. ढोबळे (नागपूर), डॉ. मनीष शिंदे (पुणे), डॉ. सी. गायनेर (इस्राईल), डॉ. हरिनाथ (वरंगल), डॉ. आर. जी. तुंगातुरी (वुहान) डॉ. प्रीती गुप्ता (जर्मनी) या विषयतज्ज्ञांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. या परिषदेचे विविध सत्र गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, डॉ. सचिन वाझलवार (चंद्रपूर), डॉ. एन. आर. पवार (मारेगाव), डॉ. ए. यु. बाजपेयी (अमरावती) यांच्या अध्यक्षस्थानी पार पडले. परिषदेच्या आयोजक सचिव डॉ. शोभा गायकवाड व डॉ. अमोल भोयर, समन्वयक डॉ. नीलेश ठाकरे व डॉ. अमोल नांदे हे होते. यशस्वीतेसाठी डॉ. दिनेश देशमुख, अविनाश रट्टे, सपना शर्मा, नीलेश शेळके व सीमा भगत यांनी प्रयत्न केले.

Web Title: Council on Physics at Guru Nanak College