शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक कर्जाच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2015 01:36 IST

सन २०१३ मध्ये डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात भाजपाच्या नेतृत्वात ‘देता की जाता’ या शीर्षकाखाली विधानभवनावर विशाल मोर्चा काढण्यात आला होता.

युती सरकारला आश्वासनांचा विसरवनसडी : सन २०१३ मध्ये डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात भाजपाच्या नेतृत्वात ‘देता की जाता’ या शीर्षकाखाली विधानभवनावर विशाल मोर्चा काढण्यात आला होता. हजारो शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी होऊन आपल्या मालाला योग्य भाव मिळावे म्हणून आशावादी होते. सरकार बदलले आणि आता सरकारला धारेवर धरणारे नेते सत्ताधारी पक्षात आहेत. पण शेतकऱ्यांची अवस्था मात्र जैसे थे असल्याने कापसाला मिळणारा हमीभाव अत्यल्प आहे. आघाडी सरकारच्या काळात मोर्चाचे नेतृत्व राज्याचे विद्यमान अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. या मोर्चात अनेक मोठे भाजप नेतेही सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी कापसाला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव देण्याचे निवेदन सरकारला दिले. पण त्यांच्या निवेदनाचा परिणाम आघाडी सरकारवर झाला नाही. कापसाला प्रति क्विंटल चार हजार रुपये होता. याहीवेळी बळीराजाची निराशा झाली आहे.२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला सरकारच्या विरोधात शेतकरी व त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याचा मुद्दा सापडला व त्यांचा प्रचारही याच मुद्दयांवर गाजत होता. परिणामी त्यांचा हेतु सफल झाला आणि त्यांना सत्ता हस्तगत करता आली. तब्बल २० वर्षानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. त्यामुळे शेतकरी बंधुनी सुटकेच्या श्वास सोडला. आता आपल्यासाठी ‘अच्छे दिन’ येणारच याची चाहुल वाटून ते आनंदात होते. पण जेव्हा मात्र मालाला कवडीमोल भाव मिळू लागला, तेव्हा मात्र शेतकऱ्यांचा भ्रम दूर झाला व त्यांना ‘जुने ते सोने’ हेच आठवू लागले.प्रचारामध्ये कापसाला हमी भाव पाच ते सहार हजार रुपये देतो म्हणणारे सरकार यांनी फक्त ५० रुपये हमी भाव वाढवून दिला. आपल्या संकट काळात शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन गोळी मारणारे नेते आता शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडून त्यांना फक्त आश्वासनाची खैरात वाटताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी बंधुंना अच्छे दिन कधी येईल याची सध्यातरी प्रतीक्षा लागली आहे.हजारो शेतकरी बांधवांना सोबत घेऊन स्वत: ची पोळी भाजणारे काही नेते आता ‘काम झाले माझे, काय करु तुझे’ या उक्तीप्रमाणेच वागताना दिसत आहेत. शेतकरी बांधवाच्या कापसाला किमान प्रति क्विंटल पाच ते सहा हजार रुपये भाव मिळावा तेव्हाच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्ज फेडता येईल. कापूस वेचणीलाच ७०० ते ८०० रुपये खर्च येतो आणि मिळणारा भाव हा तीन ते साडेतीन हजार रूपये आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. (वार्ताहर)