कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:34+5:30

सीसीआय अजूनही संथगतीने शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआय खरेदी करीत असेल. दोन्ही तालुक्यातील १६ हजार नोंदणीधारक शेतकऱ्यांना नंबर येण्यासाठी तब्बल वर्षभर ताटकळत बसण्याची वेळ येऊ शकते. शेतीचा खरीप हंगाम अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची कापूस विक्री लांबणीवर गेल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगाम करण्यास पैशाची अडचण निर्माण होणार आहे.

Cotton growers' woes end! | कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपेना !

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपेना !

Next
ठळक मुद्देकवडीमोल भावात कापूस खरेदी : सीसीआयची कापूस खरेदी संथगतीने

प्रकाश काळे / जयंत जेणेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : राजुरा, कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत घरी भरून ठेवलेल्या कापसाला खासगी बाजारपेठेतील व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करीत आहे. तर दोनही तालुक्यातील सीसीआयला कापूस विक्रीसाठी शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. परंतु एका दिवशी सीसीआयला मोजक्याच शेतकऱ्यांच्या कापूस गाड्या सोडत असल्याने राजुरा, कोरपना तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे होत असलेले हाल संपायला तयार नाही.
खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा व कोरपना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सात हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र दरदिवशी फक्त राजुरा येथे १३ ते १४ तर कोरपना येथेही मोजक्याच शेतकऱ्यांच्या कापूस गाड्या सीसीआयला विक्रीसाठी परवानगी देत असल्याने कापूस विक्रीसाठी नंबर येण्यासाठी बहुसंख्य शेतकऱ्यांना मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राजुरा व कोरपना तालुक्यातील जिनिंगवर सीसीआयची कापूस खरेदी अतिशय संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.
सीसीआय अजूनही संथगतीने शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआय खरेदी करीत असेल. दोन्ही तालुक्यातील १६ हजार नोंदणीधारक शेतकऱ्यांना नंबर येण्यासाठी तब्बल वर्षभर ताटकळत बसण्याची वेळ येऊ शकते. शेतीचा खरीप हंगाम अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची कापूस विक्री लांबणीवर गेल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगाम करण्यास पैशाची अडचण निर्माण होणार आहे. खासगी बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावात कापसाची खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत कवडीमोल भावात लुटले जात आहे.
त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरीच भरून ठेवला आहे. शेतकऱ्यांनी साीसीआयला कापूस विकण्यासाठी मोठया प्रमाणात शासकीय नियमानुसार नोंदणी केल्यामुळे शेतकऱ्यांना आता कापूस विक्रीसाठी अनेक दिवसाची बहुप्रतिक्षा करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांकडे सध्या बँकांचे कर्ज भरण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी केविलवाणा होऊन नाईलाजाने खासगी व्यापाºयांना कापूस विकत आहे.
त्यामुळे तेलंगणा राज्यातील बहुतांश शेतकरी कोरपना तालुक्यातील खासगी व्यापाºयांना कापूस विक्री करीत आहे. कापूस खराब असल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी दोन हजार रुपयांपासून कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

राजुरा येथे साडेसात हजार तर कोरपनात आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
देशावर कोरोनासारख्या महाभयानक महामारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने सुरू झालेली सीसीआय खरेदी बंद करावी लागली. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडल्याने शासनाने सीसीआयला कापूस खरेदी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार राजुरा येथे केवळ एकाच जिनिंगवर तर कोरपना तालुक्यात ४ जिनिंगवर सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे साडेसात हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आठ हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच
सध्या राजुरा व कोरपना येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. परंतु ही कापूस खरेदी अतिशय संथगतीने असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीसाठी प्रतीक्षेत आहे. मोठया प्रमाणात शेतकºयांनी नोंदणी केल्यामुळे तोकडी जिनिंगसंख्या असलेल्या कापूस संकलन केंद्रावर एवढ्या मोठया प्रमाणात असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस घेणे शक्य नाही. बहुतांश शेतकºयांचा कापूस अजूनही घरातच भरून आहे. याकडे लोकप्रतनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

राजुरा येथे सध्या एका जिनिंगवर सीसीआय कापूस खरेदी सुरू असून राजुरा येथील अन्य जिनिंगवर कापूस खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना कोणतीही अडचण जाणार नाही.
-कवडू पोटे
कृषी उत्पन्न बाजार समिती, राजुरा

Web Title: Cotton growers' woes end!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस