शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Chandrapur; चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणासाठी करावी लागते सात किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 15:53 IST

Coronavirus in Chandrapur गोवर्धन येथे उपकेंद्राची सुसज्ज इमारत उभी आहे; परंतु येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली नाही. परिणामी नागरिकांना कोविड लसीकरणासाठी सात किमीचा प्रवास करून लसीकरण करावी लागते आहे.

ठळक मुद्देगोवर्धन उपकेंद्रात लसीकरण सुरू कराकोरोनाकाळातही अधिकाऱ्यांचा मुख्यालयाला खो

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर :  जिल्ह्यात गोवर्धन येथे उपकेंद्राची सुसज्ज इमारत उभी आहे; परंतु येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली नाही. परिणामी नागरिकांना कोविड लसीकरणासाठी सात किमीचा प्रवास करून लसीकरण करावे लागत आहे. त्यामुळे गोवर्धन उपकेंद्रात लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रा. पं. सदस्य काजूल लाकडे यांनी केली आहे. येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालय तयार करण्यात आले असूनसुद्धा कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने हे मुख्यालय ओस पडले आहेत.

मूल तालुक्यातील गोवर्धन येथे इंंग्रज काळापासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अस्तित्वात आहे. लाखो रुपये खर्च करून सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली. परंतु, येथे वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी उपकेंद्रात येत नसल्याने ही वास्तू शोभेची ठरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी येथील रुग्णांना खासगी डॉक्टरकडून उपचार घ्यावा लागतो. कोविडसाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे; परंतु गोवर्धन येथे लसीकरण केंद्र नाही. परिणामी नागरिकांना बेंबाळ किंवा मूल येथे जाऊन लसीकरण करावे लागते. लॉकडाऊनमुळे दळणवळणाची साधने बंद आहेत. परिणामी नागरिकांना ४५ अंश तापमानात लसीकरणासाठी पायपीट करावी, लागत आहे. त्यामुळे गोवर्धन उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करावे, तसेच गावातील आरोग्याच्या समस्या दूर करण्याकरिता नियमित एका डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी मागणी ग्रा. पं. सदस्य काजूल लाकडे यांनी केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस