कोरोनाचा कहर सुरूच, नवे ३७३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:00 AM2020-09-17T05:00:00+5:302020-09-17T05:00:32+5:30

मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथील ७० वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. त्यांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १५ सप्टेंबरला शासकीय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू बल्लारपुरातील महाराणा प्रताप वार्डातील ४६ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला. त्यांनाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता.

Corona's havoc continues, new 373 positive | कोरोनाचा कहर सुरूच, नवे ३७३ पॉझिटिव्ह

कोरोनाचा कहर सुरूच, नवे ३७३ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देपाच बाधितांचा मृत्यू : जिल्ह्यात ६ हजार ६८२ रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : जिल्ह्यात २४ तासात ३७३ नवीन बाधितांची भर पडल्याने एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता ६ हजार ६८२ वर गेली आहे. आतापर्यंत ३ हजार ६९० बाधित कोरोनातून बरे झाले तर २ हजार ९०३ बाधितांवर उपचार सुरू आहे. बुधवारी पाच बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या ८९ झाली आहे.
मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथील ७० वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. त्यांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १५ सप्टेंबरला शासकीय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू बल्लारपुरातील महाराणा प्रताप वार्डातील ४६ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला. त्यांनाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. तिसरा मृत्यू क्राईस्ट हॉस्पिटल परिसर, चंद्रपूर येथील ६५ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला. चौथा मृत्यू चिमूर येथील टीचर कॉलनीतील ४५ वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला. कोरोनासह न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने १५ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू होते. पाचवा मृत्यू नवीन चंद्रपुरातील तुकूम एसटी वर्कशॉप परिसरातील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला. या बाधितालाही कोरोनासह न्युमोनियाचा आजार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ बाधितांचे मृत्यू झाले, अशी माहिती प्रशासनाने दिली.

चंद्रपुरात वाढत आहेत रूग्ण
चंद्रपूर शहर व परिसरात आतापर्यंत २३९ पॉझिटिव्ह आढळले. भिवापूर वार्ड, रयतवारी कालनी, रामनगर, घुटकाळा वार्ड, ऊर्जानगर, संजय नगर, जलनगर वार्ड, बालाजी वार्ड, एसटी वर्कशॉप परिसर, बापट नगर, दवा बाजार परिसर, श्रीराम चौक, एकोरी वार्ड, सुमित्रा नगर, सिंधी कॉलनी परिसर, भटाळी, छोटा बाजार परिसर, भाना पेठ वार्ड, हरिराम नगर, गोकुल वार्ड, घुटकाळा वार्ड, नगीना बाग, बापट नगर वडगाव, समता चौक बाबुपेठ, द्वारका नगरी तुकुम, ज्योती नगर या परिसरातून कोरोना बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर पंचायत समिती व तहसील कार्यालयही सील
बल्लारपूर : नायब तहसीलदार राजेंद्र जवंजाळ हे मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने शनिवारपर्यंत तहसील कार्यालयात केवळ नागरिकांच्या प्रवेशाला प्रतिबंध घालण्यात आला. मात्र, अंतर्गत दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरू राहणार आहे. पंचायत समिती व तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार एकच असल्यामुळे पंचायत समितीचेही कामकाज शनिवारपर्यंत बंद राहणार आहे. नगर पालिकाही सील आहे.

Web Title: Corona's havoc continues, new 373 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.