शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात 838 कोरोनामुक्त, 355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 19:42 IST

Coronavirus In Chandrapur today: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 73 हजार 836 झाली आहे. सध्या 5 हजार 751 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 838 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 355 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 12 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 73 हजार 836 झाली आहे. सध्या 5 हजार 751 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 55 हजार 488 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 72 हजार 12 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

 आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 59 वर्षीय महिला, वडगाव येथील 60 वर्षीय महिला, चिरोली येथील 86 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 57 वर्षीय महिला.भद्रावती तालुक्यातील वायगाव येथील 62 वर्षीय पुरुष, शेगाव येथील 68 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील 50 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील परसोडी येथील 50 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील 50 वर्षीय महिला. आरमोरी गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1368 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1268, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 36, यवतमाळ 45, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 355 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 66, चंद्रपूर तालुका 20, बल्लारपूर 62, भद्रावती 36, ब्रम्हपुरी 05, नागभिड 15, सिंदेवाही 06, मूल 27, सावली 10, पोंभूर्णा 14, गोंडपिपरी 25, राजूरा 22, चिमूर 05, वरोरा 24, कोरपना 15, जिवती 01व इतर ठिकाणच्या 02 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस