शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भाववाढीवरून सर्वत्र आक्रोश, मोबाईल रिचार्जबाबत मात्र ग्राहक गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

कांद्याच्या भावाने शंभरी पार केली, या भाववाढीने महिलांच्या डोळ्यात पाणी आले. कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. सामान्यांच्या जेवणातून कांदा हद्दपार होत आहे. यासाठी या भावनाढीविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आवाज उठविला आहे. या भाववाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. यासाठी आक्रोश करणे समजण्यासारखे आहे. यामुळे कांद्याच्या अवैध साठेबाजांना आळा बसेल व कांदा स्वस्त होऊ शकतो मात्र, याच दिवसात काही मोबाईल कंपन्यांनी मोबाईल रिचार्जमध्ये मोठी वाढ केली आहे.

ठळक मुद्देजनजागृतीची गरज : सुज्ञ नागरिक व्यक्त करताहेत आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. स्वयंपाकघरातील कांदा हा आवश्यक घटक असल्याने त्याची भाववाढ सर्वसामान्य जनतेच्या चिंतेचा विषय आहे. त्याविरुद्ध आवाज उठणे समजण्यासारखे असले तरी काही कंपन्यांनी मोबाईल रिचार्जमध्ये मोठीे वाढ केली आहे. मोबाईलदेखील आवश्यक घटक आहे. एका कुटुंबात तीन ते चार मोबाईल आहेत. रिचार्जमध्ये एवढी मोठी वाढ होऊनही समाजामध्ये या विरोधात कुठेही आक्रोश नाही. मात्र काद्यांच्या भावाबाबतच एवढी चर्चा का, असा प्रश्न आता काही सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.कांद्याच्या भावाने शंभरी पार केली, या भाववाढीने महिलांच्या डोळ्यात पाणी आले. कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. सामान्यांच्या जेवणातून कांदा हद्दपार होत आहे. यासाठी या भावनाढीविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आवाज उठविला आहे. या भाववाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. यासाठी आक्रोश करणे समजण्यासारखे आहे. यामुळे कांद्याच्या अवैध साठेबाजांना आळा बसेल व कांदा स्वस्त होऊ शकतो मात्र, याच दिवसात काही मोबाईल कंपन्यांनी मोबाईल रिचार्जमध्ये मोठी वाढ केली आहे. विद्यमान परिस्थितीत मोबाईल फोनदेखील आवश्यक घटक झाला आहे. प्रत्येक घरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतंत्र मोबाईल फोन आहे. रिचार्जमध्ये भाववाढ झाल्याने प्रत्येक कुटुंबाना मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. कांद्याचे वाढलेले भाव भविष्यात कमी देखील होऊ शकतात, अनेकदा शेतकऱ्यांना कांद्याच्या पडलेल्या भावामुळे कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागतो.यावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी कुणीच पुढे येत नाही. मोबाईल रिचार्जचे वाढलेले भाव भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. मग, तात्पुरत्या कांद्या भाववाढीविरोधात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनआक्रोश पाहायला मिळत असताना मोबाईल रिचार्ज भाववाढीविरोधात समाजामध्ये चकार शब्द देखील ऐकायला येत नाही. प्रत्येक जण शेतकºयांप्रती सहानुभूती दाखवितात. मात्र भाव वाढीनंतर एवढा आक्रोश कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :onionकांदा