शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

रेतीअभावी घरकुलाचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा, यासाठी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देणारी घरकुल योजना शासनाने १५ नोव्हेंबर २००८ पासून सुरू केली. त्या अनुषंगाने रमाई आवास योजनेंतर्गत २५० घरकुल मंजूर आहेत. तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०० घरकुल आणि शबरी आवास योजनेंतर्गत १०० घरकुले मंजूर असून तालुक्यात एकूण ५५० घरकुल आहेत. यातील काही घरकुलाचे बांधकाम सुरू असले तरी बहुतांश घरकुलांचे बांधकाम रेती मिळत नसल्याने रखडले आहेत.

ठळक मुद्देलाभार्थ्याचे स्वप्न अधुरे : प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुक्यातील काही गावांमध्ये विविध प्रवर्गातील ५५० घरकुल मंजूर झाले आहे. मात्र बांधकाम करण्यासाठी रेती मिळत नसल्याने सदर बांधकाम रखडले आहे. शासनाने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडून केली जात आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा, यासाठी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देणारी घरकुल योजना शासनाने १५ नोव्हेंबर २००८ पासून सुरू केली. त्या अनुषंगाने रमाई आवास योजनेंतर्गत २५० घरकुल मंजूर आहेत. तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०० घरकुल आणि शबरी आवास योजनेंतर्गत १०० घरकुले मंजूर असून तालुक्यात एकूण ५५० घरकुल आहेत. यातील काही घरकुलाचे बांधकाम सुरू असले तरी बहुतांश घरकुलांचे बांधकाम रेती मिळत नसल्याने रखडले आहेत. तालुक्यातील कोणतेच रेती घाट सुरू नसल्याने घरकुल बांधकामासाठी रेती आणायची तरी कुठून असा, प्रश्न स्थानिक लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता असलेल्या शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेंतर्गत स्वत:च्या घराच्या बांधकामासाठी पाच ब्रास रेती काढण्यास परवानगी देण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. मात्र तरीही रेती मिळत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांचे स्वप्न अधुरेआपले स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी प्रत्येकजण धडपड करीत असतो. अनेकवेळा इकडून-तिकडून पैसा तसेच इतर साहित्य जमा करतो. मात्र घर मंजूर असतानाही रेती अभावी अडल्याने या लाभार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उठा ठाकला आहे. त्यामुळे प्रशासनाने लाभार्थ्यांनी रेती उपलब्ध करून लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना