शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अनागोंदी कारभारातूनच व्यापारी संकुलाचे बांधकाम

By admin | Updated: March 16, 2015 00:45 IST

शिवाजी चौकातील व्यापारी संकुल नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारातूनच उभे झाले आहे.

ब्रह्मपुरी : शिवाजी चौकातील व्यापारी संकुल नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारातूनच उभे झाले आहे.७ जून २००४ ला चंद्रशेखर आनंदराव डबली यांनी व्यापारी संकुलाचे नगरपालिकेकडून प्रारंभ प्रमाणपत्र घेतले. परंतु त्यांनी हे बांधकाम सुरू केले नाही. २४ जून २००६ ला हरिश मोटवानी यांनी बांधकाम मंजुरी घेतली. परंतु, तेव्हाही बांधकाम सुरू करण्यात आले नाही. बांधकाम परवानामध्ये बांधकामाची परवानगी मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत बांधकाम सुरू करावे लागते अन्यथा ती परवानगी रद्द होते. परंतु, त्यानंतर कुठलीही परवानगी न घेता बांधकाम सुरू झाले होते. नगर परिषदेत नगरसेवक निवडून जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवडून जातात व ते केवळ जनतेचा विकास करण्याच्या दृष्टीने नव्हे तर स्वत:च्या लेआऊटचा व व्यापारी संकुलची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने जातात हे अशा अवैध व्यापारी संकुलाच्या बांधकामावरुन निष्पन्न होत आहे. शहरात या व्यापारी संकुलाव्यतिरिक्त अनेक व्यापारी संकुले याच प्रकाराची अनागोंदी कारभारातून उदयास आली आहेत. १६ नोव्हेंबर २०१० ला पुन्हा बांधकामाची परवानगी घेण्यात आली. परंतु नगरपरिषदेच्या आवक-जावक बुकावर नोंद नाही. तेव्हाही ती परवानगी केवळ नगरसेवकाच्या ताकतीवर मिळविण्यात आली असली पाहिजे. व्यापारी संकुलाची तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता यांना पूर्ण माहिती असतानाही त्यांनी या प्रकाराच्या बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांचे मत आहे. व्यापारी संकुलाचे बांधकाम २०१३ पासून सुरू करण्यात आले. एकूणच हे व्यापारी संकुल बांधकामाच्या परवानगीनुसार कुठेतरी संशयास्पद दिसून येत आहे. यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता व काही तत्कालीन नगरसेवकांचे हित लक्षात घेऊन अनागोंदी कारभाराने हे बांधकाम चिरीमिरीच्या व अमाप पैसा कमविण्याच्या दृष्टीने उदयास आले आहे. (तालुका प्रतिनिधी)