शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत काँग्रेस तर पंचायत समितीत भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 01:21 IST

अतिशय उत्कंठा असलेल्या निकालाअंती जिल्हा परिषदेच्या पाच गटापैकी तिन जागा जिंकून काँग्रेसने सरशी साधली आहे

रवी रणदिवे   ब्रह्मपुरी अतिशय उत्कंठा असलेल्या निकालाअंती जिल्हा परिषदेच्या पाच गटापैकी तिन जागा जिंकून काँग्रेसने सरशी साधली आहे तर पंचायत समितीवर दहा गणापैकी नऊ जागा भाजपाने जिंकून एकहाती सत्ता काबीज केली आहे.आज गुरुवारी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत पार पडलेल्या मतमोजणीचे अंतिम चित्र याप्रमाणे आहे. नान्होरी-अऱ्हेरनवरगाव जि.प. गटातून भाजपाचे क्रिष्णा सहारे यांनी विद्यमान सभापती नेताजी मेश्राम यांना तीन हजारपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले आहे. पिंपळगाव-मालडोंगरी गटातून काँग्रेसच्या स्मिता पारधी यांनी भाजपाच्या नंदा बनकर यांना पराभूत केले आहे. खेडमक्ता-चौगान गटातून भाजपाच्या दिपाली मेश्राम यांनी काँग्रेसच्या स्नेहा मोटघरे यांचा दोन हजारांनी पराभव केला आहे. गांगलवाडी, मेंडकी गटातून काँग्रेसचे प्रमोद चिमूरकर यांनी भाजपाच्या वंदना शेंडे यांचा पराभव केला आहे. आवळगाव-मुडझा गटात विद्यमान जि.प. सदस्य राजेश कांबळे यांचा निसटता विजय झाला असून त्यांनी भाजपाचे शंकर सातपुते यांचा पराभव केला आहे. जि.प. क्षेत्र काँग्रेस ३ तर भाजप २ जागांवर विजय झाली आहे.पंचायत समितीच्या दहा गणासाठी नान्होरी गणात ममता कुंभारे (भाजप) यांनी सुजाता मेश्राम (काँग्रेस) यांचा पराभव केला आहे. अऱ्हेरनवरगावमध्ये भाजपाचे विलास उरकुडे यांनी बिआरएसपीचे जितेंद्र गणवीर यांचा पराभव केला आहे. पिंपळगाव गणात भाजपाच्या सुनंदा ढोरे यांनी काँग्रेसच्या उर्मिला गडे यांना नमविले आहे. मालडोंगरी गणात भाजपाच्या उर्मिला धोटे यांनी काँग्रेसच्या वैशाली नाकतोडे यांना हरविले आहे. खेडमक्ता गणात भाजपाचे प्रकाश नन्नावरे यांनी शिवसेनेचे सुनिल तोडासे यांना पराभूत केले आहे. चौगान गणात भाजपाच्या प्रणाली मैद यांनी काँग्रेसच्या भाग्यश्री प्रधान यांना हरविले आहे. गांगलवाडी गणात भाजपाच्या सुनिता ठक्कर यांनी काँग्रेसच्या सुचित्रा ठाकरे यांना नमविले आहे. मेंडकी गणात काँग्रेसने बाजी मारली असून थानेश्वर कायरकर यांनी भाजपाच्या राजेंद्र दोनाडकरांनी काँग्रेसच्या दिवाकर किरमिरे यांना हरविले आहे तर मुडझा गणात भाजपाचे निलकंठ मानापुरे यांनी काँग्रेसच्या नरेंद्र नखाते यांना हरविले आहे. पंचायत समितीमध्ये नऊ जागा भाजपाने जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे.