शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याची काँग्रेसची तयारी

By admin | Updated: December 3, 2015 01:15 IST

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे.

दुसऱ्या आठवड्यात स्वतंत्र विदर्भावर चर्चा : विजय वडेट्टीवार यांची माहितीचंद्रपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार ठोस भूमिका जाहीर करणार नाही तोपर्यंर कामकाज चालवू न देण्याची रणनिती विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांनी आखली आहे.विदर्भातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, वीज दरवाढ, शेतकऱ्यांच्या योजनांना सरकारने लावलेली कात्री आदी विषयांवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सरकारला खिंडीत गाठण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची व्यूहरचना सुरु आहे. विधान सभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरातील एका पत्रकार परिषदेत मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न काँग्रेसने वारंवार केला असला तरी हे सरकार म्हणावे तसे संवेदनशिल नाही. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींची दुष्काळी मदत २०१२-१३, १३-१४ मध्ये देण्यात आली होती. राज्यातील विद्यामान सरकारने अलिकडे केवळ बाराशे कोटी रूपयांची मदत केली असली तरी आजवर सर्वाधिक मदत दिल्याचा कांगावा या सरकारकडून केला जात आहे. राज्यातील १६ हजार गावे दुष्काळाच्या यादीत असली तरी अद्यापही चार हजार गावे या मदतीपासून वंचित आहेत. व्यापाऱ्यांनी धानाचे भाव पाडले आहेत. पावसाअभावी विदर्भातील शेतकरी कफल्लक झाले आहेत. वेगळ्या विदर्भाचे आश्वासन या सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र त्यावर आता हे सरकार बोलायलाही तयार नाही. विदर्भातील शेतकऱ्यांची विपन्नावस्था सुरु असूनही सरकारने धान खरेदी केंद्र उशिराने सुरु केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ते म्हणाले, सिंचनाचे तीन हजार कोटी रूपये अखर्चित असूनही पूर्व विदर्भातील एकाही सिंचन प्रकल्पाला या सरकारने मान्यता दिलेली नाही. नव्याने दिलेल्या निधीत पूर्व विदर्भाला सिंचनासाठी नव्याने छदामही प्रस्तावित केली नाही. राज्य सरकार अधिवेशनासाठी येत असलेल्या नागपुरातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोपही आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. एलबीटी आणि टोल नाके बंद केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर सहा कोटी रूपयांची तुट येणार आहे. ती भरून काढण्यासाठी सरकाने नवी उपाययोजना करण्याऐवजी करवाढ सुरू केली आहे. सर्वसामान्यांच्या योजनांना कात्रीे लावून हे सरकार पैसा वाचवू पहात आहे. अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, कोतवालांचे चार महिन्यांपासून वेतन नाही. दारूबंदीची अवस्था वाईट असून अंमलबजावणी फसवी ठरली आहे. सरकारनेआधी तीन जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी करून दाखवावी, असेही आव्हान त्यांनी यावेळी सरकारला दिले. (जिल्हा प्रतिनिधी) पर्यटनाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेताच्या बांध्यावर जायला वेळ नाहीचंद्रपूर जिल्ह्यात मुुख्यमंत्री दोन वेळा आले. पहिला दौरा दिवाळीसाठी आणि दुसरा ताडोबा पर्यटन केंद्रातील एका रिसॉर्टच्या उद्घाटनासाठी झाला. मुख्यमंत्र्यांना पर्यटनासाठी आणि रिसॉर्टच्या उद्घाटनासाठी दुसऱ्या दौऱ्यात वेळ मिळाला मात्र शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन शेतीची पहाणी करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसचे उप गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते म्हणाले, या जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळामुळे गाव सोडून कामाच्या शोधात निघाला आहे. किमान हे चित्र त्यांनी समजून घ्यावे. वेगळ्या विदर्भाचा ठराव दुसऱ्या आठवड्यात काँग्रेसने वेगळ्या विदर्भासाठी अशासकीय ठराव मांडला असून हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तो चर्चेला येणार असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अशासकीय ठराव ६९ व्या क्रमांकाचा असून चिठ्ठीनुसार तो आता पाचव्या क्रमावर आला आहे. त्यामुळे या ठरावावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील समस्या आणि संपन्नता लक्षात घेता सरकारने हा ठराव पारित करावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली जाणार आहे.