शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

१५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यामध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ५५ हजार शेतकऱ्याची यादी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली. सोमवारी दोन गावात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. राजुरा व सावली येथील तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, पुष्पलता कुमरे व तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मोहिमेला सुरूवात झाली.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमुक्ती योजना : राजुरा व साखरी येथील यादी तयार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील राजुरा शहर व सावली तालुक्यातील साखरी येथे सोमवारी आधार प्रमाणीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोन्ही गावात १५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले.जिल्ह्यामध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ५५ हजार शेतकऱ्याची यादी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली. सोमवारी दोन गावात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. राजुरा व सावली येथील तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, पुष्पलता कुमरे व तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मोहिमेला सुरूवात झाली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियानतंर्गत राजुरा साखरी गावांच्या आधारकार्ड प्रमाणीकरणासाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली. पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात योजनेस पात्र शेतकऱ्याची यादी सोमवारी लावण्यात आली.यादीतील लाभार्थी शेतकºयांनी मूळ आधारकार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर आदी कागदपत्रांसह आपले आधारसेवा केंद्रांमध्ये जाऊन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये आपले आधार प्रमाणीकरण झाल्याची खात्री करायची होती. त्यापैकी सोमवारी दोन्ही बँका मिळून हे ४६ शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सावली तालुक्यातील साखरी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १६७ तर अन्य बँकांचे ११ खातेधारक असे एकूण १७८ पैकी सोमवारी ११२ खातेधारकांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा उपनिबंधक खाडे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. साखरी येथे तहसीलदार पुष्पलता कुमरे, सहकार अधिकारी श्रेणी-१ सुषमा शिंदे, नायब तहसीलदार प्रवीण चिडे तर राजुºयात सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक खाडे, तहसीलदार डॉ. होळी, तालुका उपनिबंधक ए.आर. तुपट आदी सहभागी झाले होते.बँक खात्यात होणार २ लाख जमाशेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ज्या शेतकºयांचे आधारकार्ड प्रमाणित करण्यात आले. त्यांच्या बँक खात्यामध्ये २ लाख राज्य शासनामार्फत जमा केले जाणार आहे. राजुरा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ४९ खातेधारक व अन्य बँकेचे ८७ खातेधारक असे एकूण १३६ खातेधारक आहेत.