शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अहवालापूर्वीच सीआरपीएफ जवान फिरत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST

राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी पुणे येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चार जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही जवानांचे विलिगीकरण करण्यात आले. मात्र, स्वॅब घेतल्यानंतर अद्याप अहवाल यायचा असताना केंद्र राखीव दलाचे जवान माजरी शहरात फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली भीती व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : जिल्ह्यात बंदोबस्ताकरिता कोल्हापूर येथून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची एक तुकडी येथील नवीन पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वसाहतीत होम क्वारंटाईनमध्ये आहे. यातील सर्व ९० जवानांचे स्कॅब तपासणीला पाठविण्यात आले. अद्याप अहवाल आला नाही. मात्र, काही जवान चहा व नाश्तासाठी शहरातील हॉटेलमध्ये फिरत असल्याची तक्रार पोलिसात करून कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली आहे.राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी पुणे येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चार जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही जवानांचे विलिगीकरण करण्यात आले. मात्र, स्वॅब घेतल्यानंतर अद्याप अहवाल यायचा असताना केंद्र राखीव दलाचे जवान माजरी शहरात फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. माजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माजरी ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, माजरीच्या नवीन पोलीस स्टेशनच्या कर्मचारी आवासमध्ये संस्थात्मक विलिगीकरणाची माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आली नाही, असे पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.नवीन पोलीस ठाणे कर्मचारी वसाहतीत जवानांना संस्थात्मक विलिगीकरणात ठेवल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली नाही. संस्थात्मक विलिगीकरणामधील काही बाहेर फिरत असल्याची तक्रार माजरी पोलीस ठाण्यात केली आहे.- डॉ. रिजवान परवीन, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र्र, माजरीबटालियनमधील कुणीही जवान बाहेर फिरत नाही. याबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. तुकडीतील सर्व जवानांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आहे.-एन. एम. बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भारतीय राखीव बटालियनकेंद्रीय राखीव बटालियनला संस्थात्मक विलिगीकरणात करण्यात आले. जि.प.सदस्य प्रवीण सूर यांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. त्या जवानांना बाहेर फिरू नये, याकरिता पोलिसांना आदेशित करतो.- महेश शितोडे, तहसीलदार, भद्रावतीकेंद्रीय राखीव दलातील जवान संस्थात्मक विलगीकरणात नाही. त्यांची केवळ राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.- सदाशिव ढाकणे, ठाणेदार माजरीकोल्हापूर येथून आलेली ही तुकडी बंदोबस्तासाठी आलेली आहे. कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी या जवानांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.- निलेश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या