शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत मिशनला चलनबंदीमुळे ‘ब्रेक’

By admin | Updated: December 22, 2016 01:42 IST

देश स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून पंतप्रधानांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.

बँकाकडून धनादेशाची रक्कम देण्यास नकार सिंदेवाही : देश स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून पंतप्रधानांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. इतकेच नव्हे तर नवीन नोटा छापताना त्यावर ‘स्वच्छ भारत’ असा संदेश लिहिला आहे. मात्र शासनाच्या चलनबंदीच्या आदेशाने स्वच्छता मिशनला ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्वच्छतेची मोहिम हाती घेताना शौचालय निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. जे गाव गोदरीमुक्त आहे, अशाच गावाना या अभियानात भाग घेता येतो. यामुळे पहिली पात्रता पूर्ण करण्याकरिता प्रत्येक गाव आणि ग्राम पंचायत त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना बँकेच्या नियमाने मोठा अडसर निर्माण केला आहे. कामाची गती मंदावल्याने स्वच्छता मिशनमध्ये प्रथम असणारे तालुके मागे पडत असल्याने दिसत आहे. घरी शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत आणि एमआरईजीएसमधून १२ ते १७ हजार रुपये दिले जातात. मात्र याकरिता एक अट आहे. पहिल्यांदा शौचालयाचे काम टप्प्या-टप्प्याने पूर्ण करायचे. त्यानुसार निधी वितरीत करण्यात येतो. शौचालय बांधण्याचे काम हाती घेणारे कुटुंबिय आर्थिक दृष्ट्या कुमकुवत आहे. यामुळे आजपर्यंत त्यांना शौचालय उभारता आले नाही. अशा स्थितीत योजनेत सहभाग घेतला गेला. इकडून- तिकडून काही पैसे गोळा झाले. मात्र बँकेचा धनादेश वढतच नाही. यामुळे नविन काम थांबले आहे. अनेक मजूर कामावर येण्यास तयार नाही. धनादेश मंजूर झाला असला तरी बँकेतून दोन हजारांवर लाभार्थ्यांचे पैसे निघत नाही. यातील बहुतांश लाभार्थी जिल्हा बँकेचे खातेदार आहे. यामुळे लाभार्थ्यांना दररोज तासन्तास बँकेत थांबावे लागत आहे. यानंतरही पैसे मिळण्याची शक्यता नाही, यामुळे कामे थांबली आहेत. (शहर प्रतिनिधी)