शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 00:45 IST

पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर तुरळक पाऊस येऊन गायब झाला.

पावसाचा दगा : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कायमप्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर तुरळक पाऊस येऊन गायब झाला. त्या पावसाने कपाशीला कोंब अंकुरले. पावसाची आवश्यकता असताना ऐनवेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. आज उद्या पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहे. परंतु, पाऊस येण्याचे कोणतेच संकेत नसल्याने कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली आहे.शेतकऱ्यांचे मागील चार पाच वर्ष कोरड्या, ओल्या दुष्काळात गेले. यावर्षी कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा दिला. चांगला पाऊस येईल आणि यावर्षी शेतात चांगले उत्पादन होईल, अशी आस शेतकरी बाळगून होते. हवामान खात्यानेही ९८ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दिवसंरात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी सुखाचे दिवस येईल, असे वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने धूळपेरणी केली. मात्र तुरळक आलेल्या पावसाने कपाशीला जमिनीतच कोंब आले. त्यानंतर तीन दिवस पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र पावसानेही ऐनवेळी शेतकऱ्यांना दगा दिला. शेतकऱ्यांनी जमिनीत पेरलेले कपाशीचे बियाणे पावसाअभावी जमिनीतच सडून गेले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांनी पावसासाठी गावोगावी आराधना करायला सुरुवात केली आहे. मात्र चार दिवसांपूर्वी आलेला पाऊस अचानक गायब झाल्याने पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उसनवारी करून शेतकऱ्यांनी बी-बियाणांची कशीबशी जुळवाजुळव केली. कर्ज काढून बियाणे विकत घेतले. पण पावसाने दगा दिला आहे. दुबार पेरणीचे संकट अटळआज, उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत बियाण्यांची लागवड केली. तुरळक आलेल्या पावसाने कपाशीची सरकी जमिनीतच खराब झाली. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला असून पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.हवामान खात्याचा अंदाज चुकला१० जून पासून पाऊस येईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. विदर्भाच्या काही भागात पाऊस पडला तर चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली. हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरल्याने शेतकऱ्यांचा हवामान खात्यावरचा विश्वासच उडत चालला आहे.