शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत विरोधात नागरिकांचा ठिय्या

By admin | Updated: March 16, 2015 00:46 IST

येथील ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आलेली नळ योजना विद्युत देयक न भरल्याने अनेकदा बंद पडली.

गोंडपिपरी : येथील ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आलेली नळ योजना विद्युत देयक न भरल्याने अनेकदा बंद पडली. याबाबत अनेक तक्रारी करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी गांधी चौक येथे ठिय्या आंदोलन केले. मात्र शनिवारपासून बंद पडलेली नळ योजना पूर्ववत सुरू झाल्याने सदर आंदोलनाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.स्थानिक ग्रामपंचायत मार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता कार्यान्वीत असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक महिण्यात वीज बिल न भरल्यामुळे बंद पडली. यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती तसेच नागरिकांच्या समस्यांकडे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ता गणेश डहाळे, अश्विन कुसनाके, संजय झाडे यांच्या नेतृत्वात आज येथील गांधी चौक येथे ग्रामपंचायत विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र कालपासूनच नळयोजना पूर्ववत सुरू झाल्याने ठिय्या आंदोलनाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद होता. तर ग्रामपंचायतीच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या कार्यकर्त्याऐवजी इतर कुठल्याही नागरिकांनी आजच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आंदोलन केवळ देखावा ठरल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)गेल्या अनेक महिन्यांपासून येथील काही तरुण मंडळी, सामाजिक कार्यकर्त्या असल्याचे सांगत आपली राजकीय खेळी साधण्यासाठी ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र आज झालेल्या ठिय्या आंदोलनाला नागरिकांनी भिख घातली नाही. याचाच अर्थ आंदोलन हे केवळ काही तरुणांचे रचलेले षडयंत्र असून केवळ पदाधिकाऱ्यांची बदनामी करणे हेच त्यामागील हेतू होता.- सुनील डोंगरे, सरपंच गोंडपिंपरी