शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा लपंडावाने पोंभूर्णा तालुक्यातील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

पोंभूर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर देवाडा खुर्द हे गाव आहे. या परिसरामध्ये थेरगाव, जामतुकूम, जामखुर्द, जाम रैय्यतवारी यासह अनेक लहान मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. गेल्यादोन महिन्यापासून सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने याचा परिणाम पाणी पुरवठा योजनेवरही होत आहे. दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देसंयम सुटण्याची शक्यता : वीज राहत नसल्याने एक दिवसाआड मिळते नागरिकांना पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : मागील दोन महिन्यांपासून देवाडा खुर्द व परिसरामध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यामुळे पाणी पुरवठ्यावरही विपरीत परिणाम पडला आहे. वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.पोंभूर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर देवाडा खुर्द हे गाव आहे. या परिसरामध्ये थेरगाव, जामतुकूम, जामखुर्द, जाम रैय्यतवारी यासह अनेक लहान मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. गेल्यादोन महिन्यापासून सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने याचा परिणाम पाणी पुरवठा योजनेवरही होत आहे. दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळा असताना सुद्धा नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार तक्रारी करूनही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दरम्यान वीज पुरवठा सुरळीत न केल्यास नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहे.ऑनलाईन व बँक व्यवहारांवर परिणामवीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शासकीय कार्यालय, बँका तसेच अन्य ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत. ऑनलाईन कामे करीत असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने कामावर परिणाम होत आहे. तसेच बँकेतील व्यवहार करताना अडचण येत आहे.पावसामुळे इन्शुलेटर पंचर होतात आणि सदर पंचर बारिक असतात. त्यामुळे फाल्ट शोधणे फार कठीण जाते. अशातच दुरुस्ती करण्यास बराच वेळ लागतो. यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला असून लवकरच सुधारणा केली जाईल.- प्रमोद गुमदेलवारउपकार्यकारी अभियंतावीज वितरण कंपनी, पोंभूर्णामागील दोन महिन्यांपासून परिसरामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे याचा परिणाम घरगुती उपकरणावर व पाणी पुरवठ्यावर होत आहे.- विठ्ठल भडके,ग्राहक, देवाडा खुर्द

टॅग्स :electricityवीज