शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत क फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारच्या जनता कफ्युनंतर सोमवारी घराबाहेर पडलेल्या चंद्रपूर शहरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केली. दरम्यान, नागरिकांनी आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीत जनता बाजारात : खबरदारी पाळण्याचे व्यापाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत क फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारच्या जनता कफ्युनंतर सोमवारी घराबाहेर पडलेल्या चंद्रपूर शहरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केली. दरम्यान, नागरिकांनी आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.जनता कर्फ्युला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार वैद्यकीय सुविधा, किराणा, भाजीपाला आदी अत्यावश्यक गरजा पुरविणारी आस्थापने सुरू राहणार आहेत. मात्र, सततच्या दोन दिवसाच्या बंद नंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता पासूनच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी घाई केली. त्यामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळावरील मेडिकल शॉप, किराणा, धान्य दुकान व भाजीपाला मार्केटमध्ये मोठी झुंबड उडाली. परिणामी, बहुतांश ठिकाणी ५ पेक्षा अधिक किती नागरिक एकत्र आल्याचे दिसून आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्याने ग्राहकांचा ओघ कायम होता. दरम्यान, सहा वाजता गोल बाजारात पोलिसांचे पथक आल्याने दुकाने बंद करण्यात आली.मॉस्क लावूनच दुकानात यावे३१ मार्चपर्यंत संचारबंदी असल्याने नागरिकांनी पुरेसा धान्यसाठा व जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यातून संपर्क वाढत असल्याने विविध आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मॉस्क किंवा रूमाल बांधूनच दुकानात यावे, असे आवाहन धान्य व भाजीपाला व्यापारी असोसिएशनने केले आहे.

चौकात पोलिसांची गस्तकोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व आस्थापने बंद आहेत. परंतु चंद्रपूर शहरातील काही चौकात छुप्या पद्धतीने सुरू असलेला गुटखा, पान विक्री सुरू असल्याचे दिसताच पोलिसांची कुमक वाढविण्यात आली. नियम तोडून गांधी चौकात येणाºया काही महाभागांना पोलिसांनी पिटाळून लावले.भाजीपाला तेजीतचंद्रपूर गंज वार्डातील भाजी बाजारात मागील सप्ताहात अल्पदरात विकणारा भाजीपाला सतत दोन दिवसांच्या बंद नंतर तेजीत आला आहे. यात काही वस्तूंचे भाव स्थिर असले तरी हिरवी मिरची, भेंडी, दोडके, शेवगा, कोथिंबीर आदीसह विविध प्रकारची फळे मंगळवारी नेहमीच्या दरापेक्षा महाग विकल्या जात होत्या. गोल बाजारातील धान्य दुकानातही सकाळी ११ वाजतापासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या