शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

वायू प्रदूषणमुळे माजरी परिसरात नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे विकार, कर्करोग, दमा, चर्मरोग, पोटाचे विकार व अन्य विकाराने ग्रस्त झाल्याचा आरोप केला जात आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात राज्य शासन, वेकोलिचे संचालक, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र वेकोलि प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप : श्वसनाचे आजार वाढल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलिने कोळसा उत्पादन करताना वायु व जल प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपायोजना न केल्याने शहरातील नैसर्गिक जलस्त्रोत दूषित झाले. श्वसनाशी निगडीत विविध आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.वायू प्रदूषणमुळे माजरी परिसरात नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे विकार, कर्करोग, दमा, चर्मरोग, पोटाचे विकार व अन्य विकाराने ग्रस्त झाल्याचा आरोप केला जात आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात राज्य शासन, वेकोलिचे संचालक, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र वेकोलि प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. १२ डिसेंबर २०१९ रोजी नागलोन यूजी टू ओसी खुल्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणासाठी कुचना येथे जनसुनावनी झाली होती. नागरिकांनी माजरी शहरातील पाणी व वायु प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित केला होता. विविध कोळसा खाणींमुळे पाणी कसे खराब होत आहे, याकडे या सुनावणीत लक्ष वेधले.माजरी शहराची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या वर्धा नदीत दूषित सोडणे बंद करा, अशी मागणी केली होती. जनसुनावणीदरम्यान प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मधुकर लाड उपस्थित होते. वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्यानंतर कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत आहेत.कामगार वसाहतीत दुर्गंधीघुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस कामगार वसाहतीमध्ये नाल्यांची स्वच्छता केली जात नाही. वेकोलि व्यवस्थापणाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नाल्या घाणीने तुडूंब भरल्या आहेत. त्यामुळे कामगारा कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इंदिरा नगर, सुभाषनगर, शास्त्रीनगर, रामनगर, आंबेडकर नगर, राजीव रतन हॉस्पिटल कॉलनी, म्हातारदेवी कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून स्वच्छतेचे निर्देश देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.माजरी वेकोलि परिसरात सीएचपी व इतर विभागाकडून माहिती घेऊन प्रदूषणाला आळा घालण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. उपाययोजनेकडे वेकोलि विेशेष लक्ष देणार आहे.- सुभोती अग्रवाल, पर्यावरण अधिकारी,वेकोलि माजरी क्षेत्र.