शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चिचपल्लीचे नाव जागतिक स्तरावर लौकिकप्राप्त ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट तसेच बांबू प्लाय युनिटचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे, गौतम निमगडे, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बांबू हॅन्डीक्रॉफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिटचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०१३ मध्ये मी फक्त आमदार होतो. त्यावेळी बांबुवर आधारित उद्योग निर्मितीसाठी मी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. २०१४ मध्ये भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या दुसऱ्याच बैठकीत चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली, काम सुरू झाले व पूर्णही झाले. या केंद्रामुळे चिचपल्लीचे नाव जागतिक स्तरावर लौकीकप्राप्त ठरेल, याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन माजी अर्थ तथा वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट तसेच बांबू प्लाय युनिटचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे, गौतम निमगडे, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मी बघितलेले स्वप्न साकार करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले, त्यांचे अभिनंदन करतो. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून यापुढील काळातही मोठे काम आपल्याला करायचे आहे. जेव्हा आपण एखादा उद्योग सुरू करतो तेव्हा तो फक्त रोजगार निर्मिती करत नाही तर त्या माध्यमातून त्या परिसराचा नावलौकीकसुध्दा वृध्दींगत होतो. बांबुपासून तिरंगा ध्वज, तलवार अशा विविध वस्तु तयार करण्यात आल्या. पहिला तिरंगा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी भेट देवू शकलो, याचा मला विशेष आनंद आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बांबूपासून तयार होणाºया इमारतीची दखल सिंगापूरच्या प्रसार माध्यमांनी घेतली. विविध प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी हे केंद्र ठरले. ही बाब विशेष अभिमानास्पद आहे. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनिय असे काम करत वनविभागाला विशेष लौकिक प्रदान केला, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी केले. बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बांबुच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आल्याचे सांगत माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात एक अद्वितीय उपक्रम या भागात आम्ही राबवू शकलो, याचा विशेष आनंद असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास