अपंगांना धनादेश वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:04 IST2016-03-13T01:04:21+5:302016-03-13T01:04:21+5:30

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जिल्ह्यातील दहा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.

Check distribution for disabled people | अपंगांना धनादेश वितरण

अपंगांना धनादेश वितरण

१० कर्मचारी : विविध तालुक्यातील कर्मचारी
घुग्घुस : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जिल्ह्यातील दहा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या हस्ते हे धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी शांताराम चौके, पार्वता गभाने, यशवंत तादाम, अविनाश जाधव, शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य संतोष कुंटावार यांच्या उपस्थितीत भद्रावतीचे सहायक शिक्षक रेवानंद रामाजी मेश्राम, ब्रह्मपुरीचे शिक्षक माधव जयराम रंधवे, विजय दामोधर नरुले, जिवतीचे केंद्र प्रमुख डी.एस. भाकरे, राजुऱ्याचे कालिदास लटारी येरगुडे, पोंभूर्णाचे संतोष मंगरू मेश्राम, चंद्रपूरच्या उज्वला गजानन गायकवाड, सिंदेवाहीचे भगवान सोमा काटकर, गोंडपिपरीचे शैलेश कालिदास झाडे, ब्रह्मपुरीचे एकादशी नथ्थू पारधी यांना प्रत्येकी ५० हजार रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Check distribution for disabled people