शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात स्मार्ट कार्डच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: February 15, 2015 00:42 IST

भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून ...

बल्लारपूर : भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून पैसे उखळण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. ‘स्मार्ट कॉर्ड’ च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असून तहसील प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.मागील चार-पाच दिवसांपूर्वी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे काही तरुणांनी स्मार्ट कॉर्ड तयार करून देण्याच्या नावाखाली आधार ओळखपत्र, निवडणूक ओळखपत्र, दोन पास पोर्ट फोटो व प्रत्येकांचे स्मार्ट कॉर्डसाठी प्रति व्यक्ति दहा रुपये जमा करण्याचे धोरण अवलंबिले. काहींनी याबाबत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कागदपत्रे जमा करणाऱ्यांकडून अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. कोणाकडून परवानगी आहे, याची विचारणा केली असता टोलवाटोलवी करणारे उत्तरे देण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. यामुळे नागरिकांना लुबाडणूक करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय बळावला आहे.असाच प्रकार तालुक्यातील मानोरा, इटोली, कवडजई आदी गावातही सुरू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. स्मार्ट कार्डच्या नावाखाली नागरिकांकडून जमा करण्यात येत असलेल्या कागदपत्राचा दुरूपयोग तर होणार नाही ना, अशी शंका नागरिकात वर्तविली जात आहे. सामान्य नागरिक या टोळीच्या भ्रामक जाळात अडकले जात आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहे. ‘स्मार्ट कार्ड’ कोणत्या एजन्सी मार्फत काढले जात आहे, याचा उलगडा आजतागायत झाला नाही. ‘आधार’ ओळखपत्र बंद करणार आहे, हे सांगण्याचे औचित्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘स्मार्ट कार्ड’ तयार करून देण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्राप्त स्थितीत जोर पकडला आहे. हे लोन इतरत्र पसरण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने यावर आळा घालणे आवश्यक असून याचा उलघडा त्वरित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्मार्ट कार्डच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पैसे उखळून गोरखधंदा चालविणाऱ्या टोळीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे याची तक्रार मात्र अद्यापही कोणाकडून करण्यात आली नाही, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)