वाहनाचा पाठलाग करुन दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:09+5:302020-12-11T04:56:09+5:30

वरोरा : दारु वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करुन पोलिसांनी ४० पेट्या देशी दारु, आठ पेट्या विदेशी दारु असा एकूण ...

Chase the vehicle and confiscate the liquor | वाहनाचा पाठलाग करुन दारुसाठा जप्त

वाहनाचा पाठलाग करुन दारुसाठा जप्त

वरोरा : दारु वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करुन पोलिसांनी ४० पेट्या देशी दारु, आठ पेट्या विदेशी दारु असा एकूण पाच लाख ९२ हजार रुपयांची दारु व वाहन असा एकूण ११ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.चारचाकी वाहनातून दारु वाहतूक होत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर नंदोरी हायवे पाइंटवर नाकाबंदी करण्यात आली. एमएच १२ डीवाय ३६३७ रंगाचे वाहन पोलिसांना बघून पळायला लागले. पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. पोलीस आपल्या मागावर येत असल्याचे बघून रस्त्यावर गाडी ठेवून पळ काढला. यावेळी वाहनातून देशी दारूच्या ४० पेट्या, विदेशी दारूच्या आठ पेट्या व वाहन असा एकूण ११ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी वाहन चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, विलास बलकी, किशोर बोढे, कपिल भांडारकर, सुरज मेश्राम, दिनेश मेश्राम, महेश बोलगोडवार आदींनी केली.

Web Title: Chase the vehicle and confiscate the liquor