शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांचा बंद सफल

By admin | Updated: July 5, 2014 01:17 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूर्ततेमध्ये मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने काढलेल्या त्रुट्यावर ...

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूर्ततेमध्ये मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने काढलेल्या त्रुट्यावर राज्य सरकारने कसलाही निर्णय न घेतल्याच्या कृतीवर रोष व्यक्त करीत चंद्रपूरकरांनी शुक्रवारी बंद पाळला. या सोबतच, रिलायन्स जीओ इंफोकॉमला शहरात केबल टाकण्यासाठी आणि १०० टॉवरच्या उभारणीसाठी महानगर पालिकेने दिलेल्या परवानगीचा निषेध व्यक्त करीत चंद्रपूरकरांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. शहरातून निघालेला विशाल मोर्चा, कार रॅली आणि धरण्यांमुळे दिवसभर चंद्रपुरातील वातावरण गरम झाले होते.काँग्रेस पक्ष, जिल्हा आरोग्य संघर्ष समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, प्राचार्य फोरम, इंडियन मेडिकल असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स आदी संघटनासह लहाकनमोठ्या व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभाग दर्शविला. सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा बंद होत्या. पेट्रोल पंप, चित्रपट गृहे, उपहारगृहदेखील बंद होती. आवश्यक सेवा वगळता बंद यशस्वी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थानिक गांधी चौकात ज्येष्ठ नागरिक संघ, प्रबुद्ध नागरिक संघ आणि शहरातील जनतेने धरणा दिला. यात माजी खासदार नरेश पुगलिया, जिल्हा परिषदेतील विरोधी गटनेते सतीश वारजुकर, मूल पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली पुल्लावार, महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेसचे गटनेते प्रशांत दानव, नगरसेवक अशोक नागापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, या धरणास्थळी चेंबर्स आॅफ कॉमर्सचे हर्षवर्धन सिंघवी व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. केवळ शहरातीलच नाही तर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनीही सहभाग घेतला.ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे, विजय चंदावार, केशव जेनेकर, गोपाल सातपुते, प्रभाकर गट्टुवार, अशोक संगीडवार, श्रीराम तोडासे, रमेश वेगीनवार, अरुण दंतुलवार, नीलकंठ बलकी, प्रा.माणिक अंधारे, द्रौपदी काटकर, कुमुद राणे यांच्यासह अनेक महिला व पुरुष नागरिक यात सहभागी होते. दुपारी अडीच वाजता ज्येष्ठ नागरिक संघ आणि चंद्रपूर जिल्हा आरोग्य संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. मनपाने मंजुरी दिलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉमचे टॉवर उभारण्याच्या आणि भूमिगत केबल टाकण्याचा ठराव रद्द करावा आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या मार्गातील त्रृट्या दूर करून याच सत्रात महाविद्यालय सुरू करावे, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली. काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय, महिला काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनीही धरण्यात उपस्थित राहून समर्थन दिले.सकाळी ११ वाजतानंतर न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानातून मोटारसायकल आणि कार रॅली काढण्यात आली. शहरभर ही रॅली घोषणा देत फिरली. (जिल्हा प्रतिनिधी)