लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : किडनी विक्री प्रकरणात आणखी तीन पीडितांची ओळख पटली आहे. उत्तर भारतातील या तीन पीडितांची किडनीसुद्धा तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्येच काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. यापूर्वी याच रुग्णालयात किडनी विक्रीतील एजंट हिमांशू भारद्वाज तसेच उत्तर प्रदेशातील पीडित मोहम्मद तारीक खान यांचीही किडनी काढल्याचे समोर आले होते. या पाचही जणांचे बयाण चंद्रपूर पोलिसांनी नोंदविले आहेत.
नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुडे याने सावकाराच्या जाचाला कंटाळून कंबोडिया येथे किडनी विक्री केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी विशेष तपास पथक गठीत केले. या पथकाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रामकृष्ण सुंचू आणि एजंट हिमांशू भारद्वाज यांना अटक केली. तपासात कंबोडियानंतर त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये दिल्ली येथे डॉ. रवींद्रपाल सिंग आणि डॉ. राजरत्न गोविंदसामी हे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करत असल्याचे समोर आले. तेव्हापासून एसआयटीचे पथक या दोन्ही डॉक्टरांच्या शोधात आहे.
गोविंदसामीला पाच
- फेब्रुवारीपर्यंत ट्रान्झिट बेल डॉ. राजरत्न गोविंदसामी याचे नाव तपासात समोर आल्यानंतर तो फरार झाला आहे. दरम्यान, त्याने ५ जानेवारी रोजी मथुराई न्यायालयात ट्रान्झिट बेलसाठी अर्ज केला होता.
- न्यायालयाने त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम ट्रान्झिट बेल मंजूर केली आहे. मात्र, त्याला पुढील काळात अँटिसिपेटरी बेल किंवा प्री-अरेस्ट बेल घेणे आवश्यक आहे. सध्या ५ फेब्रुवारीपर्यंत गोविंदसामीला अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.
Web Summary : Three more victims from North India identified in kidney selling case. Kidneys were removed at Trichy's Star Kims Hospital. Police recorded statements, investigating doctors involved in transplant surgeries.
Web Summary : किडनी बेचने के मामले में उत्तर भारत के तीन और पीड़ितों की पहचान हुई। त्रिची के स्टार किम्स अस्पताल में किडनी निकाली गई। पुलिस ने बयान दर्ज किए, प्रत्यारोपण सर्जरी में शामिल डॉक्टरों की जांच जारी।