शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur Election Results 2026 : चंद्रपुरात मनसेचा फज्जा; १५ उमेदवार रिंगणात, मात्र खातेही उघडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 18:31 IST

Chandrapur : महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या ६६ जागांपैकी मनसेने १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या ६६ जागांपैकी मनसेने १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र निकालात पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत मनसेचे 'रेल्वे इंजिन' यावेळी धावलेच नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे यावेळी पक्ष चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने या अपेक्षांना सुरुंग लावला. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक सचिन भोयर यांनाही यावेळी पराभव स्वीकारावा लागला. भोयर यांच्यासह एकाच प्रभागात दुसऱ्या गटातून त्यांचा भाऊही निवडणूक रिंगणात होता. मात्र मतदारांनी मनसेच्या उमेदवारांकडे पाठ फिरविली.

सचिन भोयर ज्या प्रभागातून २०१७मध्ये विजयी झाले होते, त्या प्रभागाचे आरक्षण यावेळी बदलले. त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागली. नव्या प्रभागातील समीकरणे न जुळल्याने त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

मनसेच्या वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष

चंद्रपूर महापालिकेत १५ जागांवर मनसेने निवडणूक लढविली. मात्र मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक काळात चंद्रपूरमध्ये एकही सभा किंवा बैठक घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून आला. त्यातच स्थानिक पातळीवरील गटबाजीने पक्षाचे मोठे नुकसान झाले. संघटनात्मक कमकुवतपणा, अपुरा प्रचार आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे मनसेला महापालिकेत खातेही उघडता आले नाही. निवडणुकीला प्रचार सुरु झाला तेव्हापासून मनसेने सोशल मीडियावर प्रचाराचा चांगलाच जोर धरला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS Fails to Open Account in Chandrapur Municipal Election 2026

Web Summary : MNS faced a setback in Chandrapur, failing to win any seats despite fielding 15 candidates. Internal strife and lack of senior leadership attention contributed to the party's poor performance. Even former corporator Sachin Bhoyar lost.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६MNSमनसे