शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातच दारुडे आहे का?

By admin | Updated: February 7, 2015 00:33 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काही विषयांवर हरकत घेत सदस्यांनी गोंधळ घातला.

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काही विषयांवर हरकत घेत सदस्यांनी गोंधळ घातला. यात दारुबंदी निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव विशेष गाजला. दारुबंदी करायचीच आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात करा. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच दारुडे आहे, का असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर, विनोद अहिरकर, दिनेश चिटणूरवार, अमर बोडलावार आदींनी केला. एवढेच नाही तर, अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ केला. या गोंधळाचे एका सदस्याने चित्रकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र अध्यक्षांनी त्याला चित्रकरण करण्यास मज्जाव केला. गोंधळामुळे याबाबत ठराव होऊ शकला नाही.हागणदारी मुक्तीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी गावागावांत दौरे करीत आहे. मात्र अध्यक्षांच्या क्षेत्रातील असलेल्या सुशीदाबगावातील आश्रमशाळा परिसरात सर्वत्र दुर्गंधी असल्याने अध्यक्षांनी प्रथम आपल्या क्षेत्रातील गावांची स्वच्छता करण्याचे काही सदस्यांनी सुचविले. विशेष म्हणजे, बल्लारपूर तालुक्याला निर्मल करण्यात येणार असून तालुका मॉडेल बनविण्यात येणार असल्याचे सभागृहात अध्यक्षांनी सांगितले. मात्र तालुक्यातील अनेक गावांत अद्यापही शौचालय नसल्याचे सदस्यांनी अध्यक्षांच्या लक्षात आणून दिले. एवढेच नाही तर या तालुक्यात केवळ तीन गावांत हागणदारीमुक्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्यांनी यापूर्वी ५०० तथा १ हजार २०० रुपयांच्या योजनेतून शौचालय बांधकाम केले. ते शौचालय आता कुचकामी झाले असल्याने नव्याने निधी देण्याची मागणी वारजूकर यांनी केली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून येथील वसंत भवन तसेच सभापतींच्या कक्षांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. मात्र या कामात जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अभियंत्यांनी भ्रष्टाचार केला असून कामे निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करण्यात आला. नागभीड तालुक्यातील नांदेड या गावातील सरपंच सत्तार शेख यांनी गावात अनेक लोकाभूमिक कामे केली आहे. त्यांच्या कामाची केंद्रसरकारने दखल घेत त्यांचा दिल्ली येथे सत्कार केला. मात्र त्यांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा परिषद विसरल्याचे वारजूकर यांनी लक्षात आणून दिले. (नगर प्रतिनिधी)