शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शहरात अस्वल घुसल्याने नागरिक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:01 IST

येथील संजय गांधी मार्केट परिसरातील एका दुकाना समोरील भागात सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान अस्वल असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर या परिसरातील गर्दी करायला सुरुवात केली. एक-एक करीत मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. दरम्यान, अनेकांनी विरोध केल्यानंतरही एकाने जीवावर बेतून तिला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती रेल्वे रुळावरून बसस्थानक परिसरात पळून गेली.

ठळक मुद्देरात्रभर शहरात : वनविभाग, इको-प्रो सदस्यांनी राबविली शोधमोहिम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सोमवारी रात्री एका अस्वलाने शहरात प्रवेश करून नागरिकांची धडकी वाढविली. रात्रभर अक्षरश: तिने शहर पिंजून काढले. दरम्यान, वनविभाग, इको प्रो, पोलीस प्रशासनाने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या अतिउत्साहीपणामुळे प्रत्येकवेळी हुलकावणी देत, दाताळा रोड परिसरातील नदीपात्रातून ती जंगलात पळून गेल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.येथील संजय गांधी मार्केट परिसरातील एका दुकाना समोरील भागात सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान अस्वल असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर या परिसरातील गर्दी करायला सुरुवात केली. एक-एक करीत मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. दरम्यान, अनेकांनी विरोध केल्यानंतरही एकाने जीवावर बेतून तिला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती रेल्वे रुळावरून बसस्थानक परिसरात पळून गेली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक लमकावार, आरएफओ राहूल कारेकर, वनकर्मचारी, वनरक्षक, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, इको-प्रोे वन्यजीव रक्षक दलाचे सदस्यांसोबतच दंगा नियंत्रक पथक आदी येथे पोहचले. मात्र अंधारामध्ये ती पळून जाण्यात यशस्वी झाली. मात्र दुकानाचा गाळा ते रुळापर्यंतचा तिचा प्रवास काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ती इरई नदीच्या मार्गाने गेल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. त्यानंतर वनविभाग तसेच इको- प्रोच्या सदस्यांनी शोध मोहिम सुरु केली असता ती कृषी विभाग कार्यालयाकडे गेली. त्यानंतर परत संजय गांधी मार्केट परिसरात आली. मात्र नागरिकांच्या गर्दीमुळे ती सैरावैरा पळू लागली. दरम्यान, विश्रामगृहाच्या मागील बाजूला असलेल्या शासकीय निवासस्थान परिसरात ती पोहचली. बाजूच्या शासकीय वसाहत असलेल्या कॉलनीमध्ये गेल्यानंतर पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळीही यश आले नाही. त्यानंतर मेडीकल कॉलेज परिसरात सिंधीकॉलनी, सिंधी ग्राऊंड तिथून रेव्हणी कॉलनी परिसरात पोहचली. मात्र येथेही नागरिकांचा अतिउत्साह बघायला मिळाला. बॅटरी तसेच लाढीकाढी घेऊन पळवून लावण्याचा प्रयत्न केल्याने एका झाडाचा आसरा घेत ती चांदा पब्लिक स्कूल परिसरात पोहचली. त्यानंतर इंगिरा गांधीस्कूल, कृषी उत्पन्न बाजार समिती, जीवन ज्योती कॉलनी परिसरातून पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान ती दाताळा मार्गे इरई नदीच्या पात्रात गेली. त्यानंतर रेस्क्यू टिमने आपली शोधमोहिम बंद केली. माहिती होताच आ. किशोर जोरगेवार यांनी संजय गांधी मार्केट तर जगन्नाथबाबा परिसरात उपमहापौर राहुल पावडे यांनी यासंदर्भात माहिती घेत शांतता पाळण्याचे आवाहन केले.एकाने घातला जीव धोक्यातसंजय गांधी मार्केट परिसरात अस्वल दिसताच एका नागरिकाने अक्षरश: तिच्या जवळ जावून हाकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मात्र तो सुदैवाने तो थोडक्यात बचावला.

टॅग्स :forest departmentवनविभाग