शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडचे केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:28 IST

केंद्र सरकारच्या आधारभूत किंमती खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात हंगाम २०१९-२० मध्ये नाफेडमार्फत मूंग, उडीद, सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी केंद्र सुरू करण्यासाठी खरेदी संस्थाकडून अर्ज मागण्यात आले आहे.

ठळक मुद्देमूग, सोयाबीन पिकांची होणार खरेदी : अर्ज सादर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमती खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यात हंगाम २०१९-२० मध्ये नाफेडमार्फत मूंग, उडीद, सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी केंद्र सुरू करण्यासाठी खरेदी संस्थाकडून अर्ज मागण्यात आले आहे.यामध्ये खरेदी केंद्र मंजूर करतांना संस्थांना प्राधान्यक्रम राहणार आहे. जिल्हा अथवा तालुकास्तरावरील अ वर्ग सभासद असलेले खरेदी विक्री संघ पणन व प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणांवरील दोन्ही अ वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील त्या ठिकाणी इतर सहकारी संस्थेस ब वर्ग सभासद करून घेऊन खरेदीचे काम देण्यात येणार आहे. खासगी बाजार समिती असा प्राधान्यक्रम राहणार आहे. खरेदी करणाऱ्या संस्थेकडे साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचा दाखला जोडावा लागणार आहे. मॉईश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक चालवण्याची क्षमता असलेले जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्टफोन, संगणक हाताळणीकरिता प्रशिक्षित असलेला सेवकवर्ग व इलेक्टॉनिक वजन काटा असणे गरजेचे आहे. सोबतच वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे भाड्याचे गोदाम आवश्यक आहे. अन्नधान्य अथवा कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी-विक्रीचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.काळ्या यादीत किंवा अपहार किंवा फौजदारी गुन्हा यासंबधी कारवाई झालेल्या संस्थांना नाकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मागील तीन वर्षाचे सनदी लेखापाल अथवा शासकीय लेखा परीक्षकांनी साक्षांकित केलेली ताळेबंद प्रत्रके संस्थेकडे १० लाख खेळते भांडवल असल्याचे बँकेचे प्रमाणपत्र, अथवा बँक पासबूक नोंद असणे आवश्यक आहे. संस्थेला पणन महासंघाकडून अनुषंगगिक व इतर खर्चापोटी रक्कम देय असल्यास त्याचा समावेश करावा लागणार आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी नाफेडने निश्चित केलेले स्टॅन्डर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर मान्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र संस्थेकडून खरेदी अथवा नोंदणीमध्ये गैरव्यवहार किंवा अनियमितता झाल्यास प्रशासकीय खर्च देण्यात येणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.नाफेडमार्फत सुरु करण्यात येणाºया केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांची दलालांकडून होणारी आर्थिक पिळवणूक टाळता येणार आहे.पणन अधिकाºयांचे आवाहनजिल्हा पणन अधिकाऱ्यांनी मागील वर्षाच्या आॅनलाईन प्रक्रियेमध्ये आॅफलाइन खरेदी अथवा गौरव्यवस्थापन न केलेल्या बाबतचा दाखल, खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र द्याव लागणार आहे. खरेदी संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड