शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

By admin | Updated: March 16, 2015 00:43 IST

काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे चंद्रपूर मनपा नगरसेवकांनी तक्रार करून चंद्रपूर ...

चंद्रपूर : काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे चंद्रपूर मनपा नगरसेवकांनी तक्रार करून चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरक र यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नंदू नागरकर यांची निवड झाल्यापासून काँग्रेसचा गढ माणल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरात जनसमर्थन कमी झाले आहे. नागरकर यांची एककल्ली कारभार व हम करे सो कायदा या वृत्तीमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी आहे. सोबतच अध्यक्षपदाच्या तोऱ्यात नागरकर यांनी जनसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या विरोधात केलेल्या नौटंकबाज आंदोलनामुळे काँग्रेसच्या प्रतिमेला डाग लागला आहे, असे म्हटले आहे. मनपा निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. पण त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर शहर व महानगर पालिका पक्षाला कधी नव्हे एवढे खाली यावे लागले. याची प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यातही दिसून आली. नंदू नागरकर हे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून मिरवत असले तरी त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्ष धोक्यात आला आहे. त्यांनी यापुर्वी अनेकदा काँग्रेस पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविली आहे. चंद्रपूर मनपात महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहून स्वत:च्या स्वार्थासाठी नंदू नागरकर व महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव म्हणवून घेणाऱ्या सुनिता लोढीया यांनी जाहिररित्या शिवसेनेचे उमेदवार आकाश साखरकर यांना हात उंचावून उपमहापौर पदासाठी मतदान केले. नागरकर हे आपल्या पदाचा गैरवापर करून शहरातील कोळसा व्यापारी, रेतीघाट ठेकेदार, लहान मोठे बिल्डर अशा अनेकांविरूद्ध तक्रारी करून त्यांना धमकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत चालली असून त्यांना पदावरून हटविण्याची मागणी माजी महापौर संगीता अमृतकर, सभागृह नेता संतोष लहागमे, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, नगरसेवक दुर्गेश कोडाम, अनिल रामटेके, मेहेर सिडाम, राजेश अड्डूर, सुभेदिया कश्यप, एस्तेर शिरवार, एकता गुरले, अजय खंडेवाल, एनएसयुआयचे अध्यक्ष कुणाल चहारे, पृथ्वी जंगम यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)