शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला पडल्या भेगा

By admin | Updated: March 23, 2015 01:14 IST

चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूल शहरातून जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला अल्पावधीतच भेगा पडल्या आहेत.

मूल : चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूल शहरातून जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला अल्पावधीतच भेगा पडल्या आहेत. १५ कोटी रुपये खर्च करून बँक आॅफ इंडिया ते पंचायत समितीपर्यंत सदर रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याच्या विस्तारासाठी १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अल्पावधीत भेगा पडल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला पुन्हा काम देण्यात येऊ नये, अशी नागरिकांची मागणी होत आहे.राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षभरापासून येथे १५ कोटी रुपयांच्या खर्चाचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील मूल शहरातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे नविन दिशा मिळाली असून शहराला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. १५ कोटी रुपयांमध्ये मूल शहरातील बँक आॅफ इंडिया ते पंचायत समितीपर्यंतच रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले. मात्र अर्धवट स्वरूपात रस्ता होत असल्याने तो वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी सतत ना. मुनगंटीवार यांच्याकडे केली. या मागणीला प्रतिसाद देत या कामासाठी १५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. कामाचे अंदाजपत्रक बनविण्याचे व प्रशासकीय मान्यतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी कोल्हापूरच्यावतीने करण्यात येत आहे. कामाचा दर्जा समाधानकारक असला तरी अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे काही दिवसात भेगाचे स्वरूप वाढणार असुन रस्त्याचा दर्जा खालवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नव्याने आलेल्या १५ कोटी रुपयांच्या कामासाठी अन्य कंपनीला काम देण्यात आल्यास कामाचा दर्जा समाधानकारक होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूलच्या नियंत्रणाखाली होत असलेल्या या सिमेंट काँक्रीट रस्त्याचा दर्जा कायम टिकविण्यासाठी स्पर्धा होणे महत्वाचे असुन स्पर्धेमध्ये दर्जा सुधारला जातो, असा अनुभव आहे. त्यामुळे १५ कोटी रुपयांच्या नविन कामासाठी कंत्राटदार बदलविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)