Cancel Direct Service Recruitment Admission Fee | सरळसेवा भरती प्रवेश शुल्क रद्द करा
सरळसेवा भरती प्रवेश शुल्क रद्द करा

ठळक मुद्देधनगर समाज महासंघ : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारने सरळ सेवा नोकर भरतीसाठी परीक्षा शुल्कावर मनमानी जीएसटी आकारत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मानसिक, आर्थिक त्रास होत आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी, यासाठी हा शुल्क रद्द करण्याची मागणी धनगर समाज महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
शासन रोजगारातून मनुष्यबळ तसेच युवकांच्या श्रम, कौशल्य, उत्पादन आणि उत्पन्नाची सांगड घालण्याचे अनेक प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर व विकासाकडे वाटचाल करण्यासाठी रोजगाराचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. पण, महाराष्ट्रातील सरळसेवा भरती प्रक्रियेत वाईट अनुभव विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहेत. मेगाभरतीची परीक्षा शुल्क २५० ते ५०० रूपये ठेवण्यात आले. सध्या सुरू असलेल्या महानिर्मिती महावितरण व इतर काही विभागात भरती प्रवेशात राज्य शासन जीएसटी लावत आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क ३०० ते ५०० ्ररूपयांपर्यंत पोहचले आहे. राज्य आणि केंद्र सरकार जीएसटीद्वारे १२.५ टक्के आणि १२.५ टक्के म्हणजे एकूण २५ टक्के जीएसटी विद्यार्थ्यांकडून गोळा करीत आहे. यातून विद्यार्थी व पालकांना आर्थिक त्रास होत आहे, असा आरोप संघटनेने केला.
विद्यार्थी जीवनात विद्यार्थी शिक्षणच घेतात. शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो म्हणजे तो बेरोजगार असतो. त्यात एवढे शुल्क आणि जीएसटी लावगून शासनाकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांवर करणे चुकीचे आहे. सरळ सेवा परीक्षेतील म्हणजे स्पर्धा परीक्षेचे शुल्क कमी करावे व जीएसटी पूर्णपणे रद्द करून विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास कमी करावा, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघचे जिल्हाध्यक्ष योगीराज बापुराव उगे जिल्हा उपाध्यक्ष गुलाब चिडे, मल्हार सेनाचे जिल्हाध्यक्ष गौरव नवले, पपीता येडे, रेखा मोंढे, रमेश बुचे, डॉ.नामदेव ढवळे, नंदकिशोर शेरकी आदींनी निवेदनातून केली आहे.


Web Title: Cancel Direct Service Recruitment Admission Fee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.