शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सात संस्थाचालकांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा दणका

By admin | Updated: February 22, 2017 00:44 IST

विश्वस्त संस्थांचे लेखा अहवाल आणि फेरफार नोंदीसाठी गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम राबवूनही प्रतिसाद न देणाऱ्या ...

नोंदणी रद्द : अनुदान थांबविण्याचे आदेशचंद्रपूर : विश्वस्त संस्थांचे लेखा अहवाल आणि फेरफार नोंदीसाठी गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम राबवूनही प्रतिसाद न देणाऱ्या जिल्ह्यातील सात संस्थांना सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाने पहिला दणका दिला आहे. या सात संस्थांची नोंदणी रद्द करून त्यांचे अनुदान थांबविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.बल्लारपूर येथील प्रियदर्शनी एज्युकेशन सोसायटी, जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ नेरी (ता. चिमूर), स्वातंत्र्यविर सावरकर ज्ञान प्रसारक मंंडळ मूल, गुरूकुल बहुउद्देशिय संस्था मूल, श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ तांबेगडी (ता. सिंदेवाही), चंद्रपूर डिस्ट्रिक स्माल स्केल इंडस्ट्रिस असोसिएशन चंद्रपूर आणि चंद्रपूर इंजिनिअरिंग असोसिएशन चंद्रपूर अशी या संस्थांची नावे आहेत.महाराष्ट्र विश्वस्त संस्था अधिनियन १९५० च्या कलम २२ (३ अ) नुसार चौकशी पूर्ण केल्यावर ही नोंदणी रद्दबादलाची कारवाई करण्यात आली आहे. मागील पाच वर्षे व त्या पेक्षाही अधिक काळापासून संस्थेचे लेखा अहवाल सादर न करणे, चौकशीच्या कामी हजर न राहणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे या कार्यालयाने कळविले आहे. या संस्थांना समाजकल्याण विभाग अथवा शिक्षण विभागाकडून निधी मिळत असल्यास तो थांबविण्याचे आदेशही सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. मागील महिन्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात या मोहिमेसाठी विशवस्त संस्थांना आवाहन करून राज्यात विशेष अभियान राबविण्यात आले होते. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळाला होता. असे असले तरी राज्यात अनेक संस्थांकडून ही प्रक्रिया सुरू असल्याने या योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्यात हिशेब सादर न करणाऱ्या संस्थांवर संस्था रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावले जात आहेत.यामुळे गेल्या दिड महिन्यापासून या कार्यालयात संस्थाचालकांची आणि पदाधिकाऱ्यांची गजबज वाढली आहे. एकाच वेळी सात संस्थांची नोंदणी रद्द करण्याच्या या निर्णयामुळे विश्वस्त संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बरीच खळबळ निर्माण झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) लेखा अहवाल सादर न करणाऱ्या संस्थांवर नोटीस बजावण्यात आले आहेत. अशा संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी संबंधित तारखेला कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. ही कारवाई नियमानुसारच झाली असून यापुढेही सुरू राहणार आहे. संस्थाचालकांनी चौकशीत सहभाग घ्यावा आणि या मोहिमेची गांभीर्याने दखल घ्यावी. - आर. एन. चव्हाण धर्मदाय आयुक्त ०१, चंद्रपूर