शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचा नवा आदर्श निर्माण करा

By admin | Updated: October 16, 2015 01:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा धम्मरथ पुढे नेण्याची जबाबदारी आपणावर सोपविली आहे.

विनयबोधिप्रिय थेरो : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला थाटात प्रारंभचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा धम्मरथ पुढे नेण्याची जबाबदारी आपणावर सोपविली आहे. त्या अनुषंगाने आजचा दिवस विचारमंथनाचा आहे. या दिशेने आपण वाटचाल करून त्यांचा नवा आदर्श निर्माण करा, असे प्रतिपादन भन्ते विनय बोधिप्रिय थेरो यांनी केले.दीक्षाभूमी येथे आयोजित ५९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन समारंभाचे उद्घाटन भदन्त महापंथ महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरूण घोटेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भन्ते अनिरूद्ध, भन्ते नागदिपंकर थेरो, भन्ते श्रद्धारक्षीत, भन्ते आनंद, भन्ते संघवंशी, भन्ते श्रद्धापाल, भन्ते मंगल, भन्ते धम्मचक्र, भन्ते सुमंग, मारोतराव खोब्रागडे, वामनराव मोडक, अशोक घोटेकर, कुणाल घोेटेकर, राहूल घोेटेकर आदी उपस्थित होते.५६ वर्षांपूर्वी येथील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या ऐतिसासिक दीक्षांत समारोहाच्या चिरंतन आठवणींना उजाळा देत गुरूवारी येथे ५९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे थाटार उद्घाटन झाले. शोषित पीडित, दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो अनुयायी कानाकोपऱ्यातून चंद्रपुरात दाखल झाले अन् संपूर्ण दीक्षाभूमी परिसर जयभीमच्या गजराने फुलून गेला. १६ आॅक्टोबर १९५६ ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना तथागतांच्या धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माचा स्वीकार हे बौद्ध धम्माचा पूर्नरूज्जीवनाच्या क्रांतीकार्याचे पहिले पाऊल होते. ही जगातील अद्भूत व ऐतिहासिक घटना चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर घडली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती सतत होत राहावी, यासाठी दरवर्षी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूरच्यावतीने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ आयोजीत केला जातो. गुरूवारी विश्वशांती व विश्वबंधुत्व वाहन रॅलीने महोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर धम्मभूमीवर पंचशिल ध्वजारोहण करून तथागत बुद्धाच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलीत करून मुख्य समारंभाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात बोलताना भन्ते अनिरूद्ध यांनी दिवंगत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्यांदा चंद्रपुरात धम्मदीक्षेचा सोहळा घेण्यात आल्याच्या घटनेला उजाळा दिला. ते म्हणाले, भारत ही बुद्ध भूमी आहे. बुद्धाचे तत्वज्ञान काल्पनिक नसून अधिष्ठाणाने परिपुर्ण आहे, असे सांगितले. तथागताचा धम्म मार्ग मानवाला केंद्रस्थानी माणनारा आहे. तो दु:ख मुक्तीचा आहे. आपला तोल जाऊ न देता, धम्माचे आचरण प्रामाणिकपणाने केल्यास सुखप्राप्ती मिळते, असे भन्ते नागदिपंकर यांनी सांगितले. दरम्यान हेमंत शेन्डे आणि संचाने वंदन सादर करून वातावरण भारावून टाकले. (स्थानिक प्रतिनिधी)