शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने वार करून भावाचा खून

By admin | Updated: March 31, 2015 01:03 IST

तालुक्यातील चिंचोली येथील एका ४२ वर्षीय इसमाने चाकू भोसकून आपल्याच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना

ब्रह्मपुरी : तालुक्यातील चिंचोली येथील एका ४२ वर्षीय इसमाने चाकू भोसकून आपल्याच मोठ्या भावाचा खून केल्याची घटना सोमवारी चिंचोली शेतशिवारात सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मुरलीधर केवळराम लांडगे असे मृत भावाचे नाव आहे. तर सत्यवान केवळराम लांडगे (४२) असे आरोपीचे नाव आहे. चिंचोली शिवारात लांडगे यांचे शेत आहे. आरोपी सत्यवान लांडगे हा मागील १५ वर्षांपासून शेतामध्ये झोपडी बांधून राहत होता. त्याचे गावातील कोणत्याही इसमाशी खास संबध नव्हते. एकप्रकारे सत्यवान हा मानसिकतेने दुर्बल असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत मुरलीधर लांडगे हे सोमवारी सकाळी ११ वाजता आपल्या शेतावर कामानिमित्ताने गेले असता, शेतावरच्या झोपडीतून आरोपी सत्यवान चाकू घेऊन आला व त्याने मुरलीधर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे मुरलीधर लांडगे यांचा जागीच मृत्यू झाला. मृत मुरलीधर आरोपी सत्यवानचा मोठा भाऊ असून कुटूंबामध्ये प्रमुख होता. आरोपी सत्यवानने मुरलीधर यांना ठार मारल्यानंतर झोपडीत जावून नवीन कपडे घालून घटनास्थळावरून पसार झाला. घटनेचा मर्ग पोलिसांत दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीवर कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)