शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

धुरांच्या लोंढ्यामुळे सास्तीवासीयांचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुरामुळे अनेकांना ह्दयाच्या व दम्याच्या आजाराला बळी पडावे लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। गाव कोळसा खाणींनी वेढले, वाढत्या प्रदूषणामुळे दम्याच्या व डोळ्यांच्या रूग्णात वाढ

नितीन मुसळे।लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलिच्या विविध कोळसा खाणींने वेढलेल्या सास्ती गावातील जनता मागील अनेक वर्षापासून धुरांच्या लोंढ्यात जगत असून या धुरातून निघणाऱ्या विविध विषारी वायूमुळे अनेकांना दम्याच्या व डोळ्यांच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. तर बालकांच्याही प्रकृतीवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी अशा विविध भूमिगत व खुल्या खाणी सास्ती गावाच्या परिसरात असून काही खाणी तर अगदीच गावाला लागून आहेत. या कोळसा खाणीतील कोळसा वाहतूकसुद्धा सास्ती गावाजवळून होत असल्याने कोळशाची धूळ, जळालेल्या कोळशाचा धूर, कोळशातून निघणारा विविध विषारी वायू नागरिकांना आजाराच्या खाईत लोटत आहे.कोळशाच्या शेगडीचाही धूरशासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुरामुळे अनेकांना ह्दयाच्या व दम्याच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. तर बालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोळशाच्या ज्वलनानंतर विविध विषारी वायू बाहेर पडत असतात. ते विषारी वायू अत्यंत हानीकारक असून आरोग्यास धोकादायक आहे. ही गंभीर बाब आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळीच या धुरावर व धुळीवर आळा न घातल्यास भविष्यात सास्तीवासीय जनतेला हदयाच्या रोगापासून कुणीही वाचवू शकणार नाही, हे मात्र खरे.सास्ती गावात मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग वास्तव्यास आहे. गरिबीमुळे स्वयंपाकासाठी त्यांना कोळशाच्या शेगडीचा वापर करावा लागत आहे. उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत अनेकांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाले असले तरी अनेक गरीब जनता यापासून वंचित आहे. त्यांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाल्यास यावर आळा बसू शकते.- रमेश पेटकर, सरपंच सास्तीकोळसा खाण परिसरात पसरलेली धूळ, सोबतच जळालेल्या कोळशातून निघणारा धूर आरोग्यास अत्यंत धोकादायक असून यामुळे परिसरातील जनतेला हदयाच्या रोगासोबतच दमासारख्या रोगाला बळी पडावे लागत आहे. तर धुळीमुळे डोळ्यांच्या आजाराच्या रूग्णातही वाढ होत आहे.- डॉ. ए. डी. जाधव,वैद्यकीय अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली (बू.)