भरधाव कारच्या धडकेने लहान मुलगा हवेत फेकल्या गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:37 IST2021-02-27T04:37:58+5:302021-02-27T04:37:58+5:30

चंद्रपूर : नागपूर मार्गावर पडोली चौकाच्या अलीकडे एका भरधाव कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी ...

The boy was thrown into the air by a speeding car | भरधाव कारच्या धडकेने लहान मुलगा हवेत फेकल्या गेला

भरधाव कारच्या धडकेने लहान मुलगा हवेत फेकल्या गेला

चंद्रपूर : नागपूर मार्गावर पडोली चौकाच्या अलीकडे एका भरधाव कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील लहान मुलगा हवेत फेकल्या गेला. तो कारच्या टफवर पडून खाली पडला. यामध्ये लहानमुलासह दुचाकीचलक गंभीर जखमी झाले. कारचेही मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींची नावे मात्र कळू शकली नाही. टीव्हीएस एचएच ३४ बीयू ६३३२ क्रमांकाची दुचाकी पडोली चौकाकडे जात होती. दुचाकीवर एक लहान मुलगा मागच्या सीटवर बसलेला होता. अचानक भरधाव आलेल्या एमएच ३३ ए ३२९३ क्रमांकाच्या भरधान कारने दुचाकीला मागावून जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील लहानमुलगा हवेत उडून कारवर व नंतर खाली पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती होताच पडोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, तेथे जमलेल्या नागरिकांनी जखमींना एका ऑटोमध्ये रुग्णालयात हलविले.

Web Title: The boy was thrown into the air by a speeding car