शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

ढिलाईतून जन्मास येऊ शकतात दारू तस्कर

By admin | Updated: April 24, 2015 00:54 IST

कायदा जिथे ढिला पडतो, तिथूनच गुंडगिरी डोकावायला सुरूवात होते, हा सार्वत्रिक अनुभव आहे.

रुपेश कोकावार बाबुपेठ(चंद्रपूर)कायदा जिथे ढिला पडतो, तिथूनच गुंडगिरी डोकावायला सुरूवात होते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी व्हावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी अनेक ठिकाणी दिसत असलेल्या ढिलाईमुळे नवे तरूण या व्यवसायात उतरण्यासाठी संधीच्या शोधात आहेत. अंमलबजावणीतील ढिलाईतून उद्याचे दारूतस्कर जन्मास येण्याची भीती असल्याने ही धोक्याची घंटा आहे.जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून तळीरामांना आपली ‘तहान’ भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पोलिसाच्या धाकाने अनेक दारुविक्रते शांत बसले आहेत. अवैध दारूविक्रीच्या अडड््यांवरही सन्नाटा दिसत आहे. असे असले तरी जिल्ह्याबाहेरुन येणारी दारु रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. ही संधी शोधून अनेक तळीराम आणि तळीरामांची काळजी वाहणारे आता जिल्हा ओलांडत आहेत. बाहेर जिल्ह्यातून आठ ते दहा दिवस पुरेल इतका दारुसाठा ते सोबत घेऊन येतात, अशी माहिती आहे. प्रवासाचा खर्च वसूल व्हावा यासाठी आणलेल्या दारुपैकी थोडी अगदी जवळच्यांना विकण्याचे प्रकारही हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील काही मोक्याच्या पानटपऱ्यांवर गर्दी दिसायला लागली आहे. हा प्रकार असाच वाढत राहीला तर, चंद्रपूरचे वर्धा आणि गडचिरोली होण्याची दाट शक्यता आहे. कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी छुप्या मार्गाने आणलेली दारु अगदी गुप्तपणे विकण्याचा अवैध धंदा काही युवकांनी सुरु केला आहे. सुरुवातीला हे तरुण स्वत:च्या गरजेपुरती दारु आणून गरज भागवत होते. परंतु जिल्ह्याच्या सिमेपलिकडून दारु आणणे त्यांना सहज शक्य असल्याने आता यातून अर्थाजन करण्याचा मार्ग या युवकांनी शोधला आहे. यावर लवकर आळा बसणे गरजेचे आहे. अन्यथा या युवकांतूनच उद्या कुणी दारू तस्कर म्हणून उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.