मूल येथे आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:56+5:302021-07-09T04:18:56+5:30

रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ...

Blood donation Mahayagya of Lokmat today at Mul | मूल येथे आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

मूल येथे आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मूलच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार आदी उपस्थित राहणार आहेत.

‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन लोकमतचे मूल तालुका प्रतिनिधी राजू गेडाम ९४२३४०१९११, शहर प्रतिनिधी भोजराज गोवर्धन ७५८८८८३४७५ , सखी मंचच्या तालुका संयोजिका जयश्री चन्नूरवार ८९९९४६६६८२, अशोक येनुरकर, शशिकांत गणवीर, गंगाधर कुनघाडकर, सुजित कडस्कर आदींनी केले आहे.

बॉक्स

या संघटना सहभागी

या रक्तदान शिबिराला मूल नगर परिषद, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा मूल, साई मित्र परिवार मूल, दरार दुर्गा मंडळ मूल, उलगुलान संघटना मूल यासह विविध संघटनांचा सहभाग आहे.

Web Title: Blood donation Mahayagya of Lokmat today at Mul