शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अस्थिकलश स्पर्शाने दीक्षाभूमी धन्य

By admin | Updated: October 17, 2015 01:30 IST

चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमीवर ५९ वर्षापूर्वी १६ आॅक्टोबर १९५६ ला डॉ.बाबासहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना तथागताच्या बुद्ध धम्माची दीक्षा दिली.

श्रीलंकेतून आला कलश : दर्शनासाठी अलोट गर्दीचंद्रपूर : चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमीवर ५९ वर्षापूर्वी १६ आॅक्टोबर १९५६ ला डॉ.बाबासहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना तथागताच्या बुद्ध धम्माची दीक्षा दिली. ही जगातील अद्भूत व ऐतिहासिक घटना या पवित्र भूमिवर घडली. या क्रांतीकारी घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी श्रीलंकेतील पुरातत्व विभागाने उपलब्ध करून दिलेला बुद्ध-भीम अस्थिधातू कलश येथे दाखल झाला आणि या अस्थिकलशाच्या स्पर्शाने दीक्षाभूमी पुन्हा एकदा धन्य झाली. या पवित्र कलशाच्या दर्शनासाठी बौद्ध बांधवांची अलोट गर्दी उसळली होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्यावतीने आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या दुसऱ्या दिवशीचा प्रारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन व श्रीलंका येथील पुरातत्व विभागाकडून प्राप्त तथागत भगवान बुद्धांचा पवित्र अस्थिधातूकलश व बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह भिक्खू संघाच्या आणि समता सैनिक दलाच्या पथसंचलनासह मिरवणुकीने झाला. संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या नेतृत्वात ही मिरणूक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व सामुहिक बुद्ध वंदनेनंतर बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर ही मिरवणूक जटपुरा मार्गे प्रियदर्शिनी चौकातून वरोरा नाका मार्गाने दीक्षाभूमीवर पोहचली. या मिरवणुकीत समता सैनिक दलाचे ५०० सैनिक सहभागी झाले होते. ही मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहचल्यानंतर भदन्त आर्य नागाजूर्नन शुरेत्र ससाई यांच्या हस्ते बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिकलश व बाबासाहेबांच्या अस्थिकलशास जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आले. त्यानंतर समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी भदन्त सुरेई ससाई यांना मानवंदना दिली.कार्यक्रमाची सुरूवात सामूहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेंडे व संचाने स्फुर्तीगिते सादर केली. या अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई होते. (प्रतिनिधी)