राज्य सरकारविरोधात भाजपचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST2021-11-06T05:00:00+5:302021-11-06T05:00:51+5:30
अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीची भरपाई अद्याप न दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी भद्रावती तालुका व शहरच्या वतीने भद्रावती तहसील कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारविरोधात भाजपचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भारतीय जनता पार्टी भद्रावती तालुका व शहरच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विरोधात धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले.
अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीची भरपाई अद्याप न दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी भद्रावती तालुका व शहरच्या वतीने भद्रावती तहसील कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी पं.स. सभापती प्रवीण ठेंगणे, किशोर गोवारदिपे, नरेंद्र जीवतोडे, जि.प. सदस्य यशवंत वाघ, अफझलभाई, संजय वासेकर, रवींद्र सहारे, संजय ढाकणे, माधव बांगडे, निशांत देवगडे, गोविंदा बिंजवे, गजानन कामतवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.