मासळ बु ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:26 IST2021-02-12T04:26:32+5:302021-02-12T04:26:32+5:30

चिमुर तालुक्यातील मासळ बु ग्रामपंचायतीवर भाजपाप्रणित ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व स्थापित झाले आहे. सरपंचपदी विकास महादेव धारणे तर उपसरपंचपदी प्रमोद ...

BJP's flag on Masal Bu Gram Panchayat | मासळ बु ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

मासळ बु ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

चिमुर तालुक्यातील मासळ बु ग्रामपंचायतीवर भाजपाप्रणित ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व स्थापित झाले आहे.

सरपंचपदी विकास महादेव धारणे तर उपसरपंचपदी प्रमोद कृष्णदास खापर्डे यांची निवड करण्यात आली आहे.

आदर्श ग्रामपंचायत मासळ बु येथील निवडणुक मंगळवारी पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश वासनिक यांनी काम पाहिले. येथे ९ सदस्यापैकी भारतीय जनता पार्टी प्रणित पाच तर शेतकरी शेतमजुर पॅनलचे चार उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. सरपंचपद हे अनुसूचित जमाती (खुला ) करिता असल्याने विकास धारणे यांचा सरपंच पदाकरिता तर उपसरपंच पदाकरिता प्रमोद खापर्डे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. निवडणुकीत ते विजयी झाले.

Web Title: BJP's flag on Masal Bu Gram Panchayat