भाजपातर्फे कोविड योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST2021-05-30T04:23:15+5:302021-05-30T04:23:15+5:30

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सात वर्ष पूर्तीनिमित्त माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी जि. प. अध्यक्ष ...

BJP felicitates Kovid warriors | भाजपातर्फे कोविड योद्धांचा सत्कार

भाजपातर्फे कोविड योद्धांचा सत्कार

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सात वर्ष पूर्तीनिमित्त माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर (ग्रामीण) च्या वतीने शनिवारी कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, जि.प. सदस्य रणजित सोयाम, सरपंच संगिता पारखी, उपसरपंच निखिलेश चामरे, अजय आमटे उपस्थित होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र ताडाळी, उपकेंद्र यशवंतनगर येथील डॉक्टर, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, शिल्ड व हार टाकून सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. व्यंकटेश भंडारी, डॉ. दामिनी थेरे, रवी पोचमवार, आरोग्य सहायक सेलोटे, बावणे, प्रणाली ताकसांडे, आरोग्य सहायक तुंबडे, आरोग्य सहायक एस. एन. ठमके, आरोग्य सहायक एस. वी. कहुरके, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी भा. ज. यु. मो. तालुका अध्यक्ष अनिल डोंगरे, उपाध्यक्ष अजय चालेकर, सचिव विनोद खडसे, सरचिटणीस दुर्गा बावणे, सचिव अन्नू ठेंगणे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: BJP felicitates Kovid warriors