शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

दोन झाडांमधे जाळे टाकून पक्ष्यांची शिकार

By admin | Updated: February 7, 2015 23:20 IST

मांगरुड आणि तालुक्यातील इतर मालगुजारी तलावानजिक झाडावर जाळे टाकून पक्ष्यांची शिकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अवैध शिकारीत

नागभीड: मांगरुड आणि तालुक्यातील इतर मालगुजारी तलावानजिक झाडावर जाळे टाकून पक्ष्यांची शिकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अवैध शिकारीत रोज शेकडो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे.तलावाच्या एका बाजूला शेती आणि दुसऱ्या बाजूला जंगल अशा प्रकारचा तलाव देशी विदेशी पक्ष्यांसाठी अतिशय महत्वाचा असतो. ही बाब मांगरुड आणि तालुक्यातील इतर अनेक तलावांना लागू आहे. या ठिकाणी देशी विदेशी पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मुक्तसंचार असतो. अशा तलावावर बदके, करकांचे, पाणकावळे, बगळे, ढोकरी, पोपट तसेच इतर पक्षी मोठ्या संख्येने वावरत असतात. दिवसभर तलाव आणि शेतात उदरभरणाची प्रक्रियावरुन सायंकाळी हे पक्षी झाडांवर मुक्कामाला येत असतात. नेमका याच संधीचा फायदा शिकारी घेत आहेत. दोन झाडांच्या मधोमध जाळे लावून पक्ष्यांची शिकार या शिक्षकाऱ्यांकडून होत आहे. संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात पक्ष्यांना निट दिसत नसल्यामुळे पक्षी या जाळ्यात अलगद अडकत आहेत. येथील पक्षी अभ्यासक सतिश चारथळ आणि प्रशांत वालदे हे पक्षी नोंद घेण्याकरिता जंगलभ्रमण करीत असताना हा धक्कादायक प्रकार त्यांच्या नजरेस आला. उल्लेखनीय बाब अशी की त्यांनी हे जाळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता हे जाळे फार उंचावर असल्यामुळे त्यांना यात यश आले नाही. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात वनविभागाकडून पक्ष्यांची आणि पाणपक्ष्यांची प्रगणना करण्यात आली आणि त्यानंतर लगेच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (तालुका प्रतिनिधी)